मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बंदी घातलेल्या ड्रग्ससाठी जप्तीच्या संदर्भात सोमवारी सकाळी मुंबईला परतताना कॉर्डीलिया क्रूझवर पुन्हा छापा टाकला. एनसीबी अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आले आहे की, सोमवारीही या शोधात क्रूझमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. यासह, या प्रकरणी इतर 6 जणांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. क्रूझ जहाजाच्या वरच्या डेक आणि खोल्यांमधूनही ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर सात जणांना रविवारी एनसीबीने गोवा जाणाऱ्या कॉर्डीलिया क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली. एनसीबीला सोमवारी माहिती मिळाली, हे जहाज दोन दिवसांनी शहरात परतले आहे. यानंतर त्याचे अधिकारी टर्मिनलवर पोहोचले आणि त्याचा शोध सुरू केला, जो अजूनही सुरू आहे. एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडेदेखील तेथे उपस्थित आहेत.
कंपनीने काय निवेदन दिले?
एनसीबीच्या प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने शनिवारी संध्याकाळी गोवा जाणाऱ्या कॉर्डीलिया क्रूझ जहाजावर छापा टाकला आणि काही प्रवाशांकडून अंमली पदार्थ जप्त केले. छाप्यात 13 ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी (मेफोड्रोन), 21 ग्रॅम चरस आणि 22 एक्स्टसीच्या गोळ्या आणि 1.33 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले. क्रूझ कंपनीने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही. वॉटरवेज लेझर टूरिझम प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष जर्गन बेलोम यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कॉर्डीलिया क्रूझचा या घटनेशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. कॉर्डीलिया क्रूझने आपले जहाज एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्लीस्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने दिले.
हेही वाचा - Cruise Drug Case : आर्यन खानला दिलासा नाहीच.. तिन्ही आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी
आर्यन खान व्यतिरिक्त, अटक केलेल्या आरोपींची ओळख मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंट, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा अशी आहे, असे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.