ट्रम्प यांना सद्बुद्धी, इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला मागे
नवी दिल्ली - इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने एका अमेरिकी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. वाचा सविस्तर...
मुंबई-गोवा महामार्गावरील गडनदी पुलाचा जोडरस्ता खचला; एकेरी वाहतूक सुरू
सिंधुदुर्ग - मुंबई गोवा महामार्गावरील कणकवली गडनदी पुलाचा जोडरस्ता गुरुवारी सायंकाळी खचला. यामुळे सध्या येथून एकेरी वाहतूक सुरू आहे. मान्सूनपूर्व पावसातच या नव्या रस्त्याला १० ते १२ फुटांचे भगदाड पडल्याने रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत संताप व्यक्त केला जात आहे. वाचा सविस्तर...
निष्पाप चिमुकली ठरली मेळघाटातील भीषण पाणीटंचाईची बळी
अमरावती - मेळघाटातील ५० पेक्षा अधिक गावात पाण्याच्या दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे ३० टँकरने पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईमुळे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेली बालिका बादली ओढत असताना तोल जाऊन विहिरीत पडली. त्यामुळे त्या बालिकेला जीव गमवावा लागला आहे. मनीषा धांडे असे त्या विहिरीत पडून मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना चिखलदरा तालुक्यातील मोथा गावात घडली. वाचा सविस्तर...
नागपुरात महिलेचा सायकलवर योगा; आसने पाहुन तुम्हीही व्हाल अचंबीत!
नागपूर - योग अभ्यास हा भारताने जगाला दिलेला अमूल्य ठेवा आहे. निरोगी आणि सुदृढ आयुष्य जगायचे असल्यास नियमित योगा हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. त्यामुळेच भारतीय योग साधना आता देशविदेशात प्रचलित झाली आहे. योगा करण्याचे विविध प्रकार प्रसिद्ध होत असताना आता त्यात 'सायकल योगा'ची भर पडली आहे. योग दिनानिमित्ताने 'ईटीव्ही भारत'चा खास वृत्तांत...वाचा सविस्तर...
हृतिक रोशनच्या 'सुपर ३०'चं दुसरं गाणं प्रदर्शित, पाहा बेरंग जगाचं रंगलेलं वास्तव
मुंबई - हृतिक रोशनचा 'सुपर ३०' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणं प्रेक्षकांना पाहायला मिळाले. ट्रेलर पाहून चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. आता या चित्रपटातलं दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यातून बेरंग जगाचं रंगलेलं वास्तव पाहायला मिळतं. वाचा सविस्तर...
*बातमी.. सर्वात आधी*
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra