ETV Bharat / state

आज.. आत्ता... शुक्रवारी दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - ETV Bharat

नाशकात मुथ्थूट फायनान्समध्ये गोळीबार झाला असून एकाचा मृत्यू झाला आहे, तर पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतील डॉक्टर संपावर गेले आहेत. वाहतूक नियमांच्या नावावर मुंबईकरांचे कोट्यवधी रुपयांची लूट करणारे विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला दिलेले टोइंगचे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. शिवाय पुण्यात पतीने पत्नीसह मुलगा आणि मेहुण्यावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे, तर कोल्हापूरची 'चेरापुंजी' गगनबावड्यात वरुणराजा दाखल झाला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी
author img

By

Published : Jun 14, 2019, 2:02 PM IST

नाशकात मुथ्थूट फायनान्समध्ये गोळीबार; एकाचा मृत्यू, ३ जण जखमी

नाशिक - उंटवाडी येथील मुथ्थूट फायनान्समध्ये दरोडा टाकण्यात आला आहे. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर ३ कर्मचारी जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर...

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतील डॉक्टर संपावर

मुंबई - पश्चिम बंगाल येथे एका सहाय्यक डॉक्टरला मारहाण झाली होती. यासंदर्भात मारहाण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करत मुंबईतील सायन, जे. जे. व नायर रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला आहे. यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होताना दिसत आहेत. वाचा सविस्तर...

विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला दिलेले टोइंगचे कंत्राट रद्द; मुख्यमंत्र्यांना मोठा दणका

मुंबई - पारदर्शकतेचा बुरखा पांघरुन भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा आव आणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला मोठा दणका बसला आहे. वाहतूक नियमांच्या नावावर मुंबईकरांचे कोट्यवधी रुपयांची लूट करणारे विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला दिलेले टोइंगचे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. गेली ४ वर्षे कंत्राटदाराची नियुक्ती मुंबई वाहतूक पोलिसांकडून केल्याचे सांगत विरोधकांचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे सांगणारे मुख्यमंत्री फडणवीस आता मात्र सपशेल तोंडघशी पडले आहेत. वाचा सविस्तर...

पुण्यात चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीसह दोन जणांवर चाकू हल्ला, मुलाचा मृत्यू

पुणे - चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी, मुलगा आणि मेहुण्यावर चाकूने वार केले. तसेच स्वतः वरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील लोणी काळभोर येथे गुरुवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या चाकू हल्ल्यात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...

व्हिडिओ : कोल्हापूरची 'चेरापुंजी' गगनबावड्यात वरुणराजा दाखल

कोल्हापूर - अरबी समुद्रातील वायू वादळाच्या आक्रमणानंतर आता जिल्ह्यात पाऊस येऊन धडकला आहे. कोकण किनारपट्टीलगत आणि जिल्ह्याची वेस असणाऱ्या गगनबावड्याच्या घाटमाथ्यावर पावसाला सुरुवात झाली आहे. गगनबावडा परिसरातील पहिल्या पावसाची आणि ढगात हरवलेल्या घाटमाथ्याची दृश्ये खास 'ई टीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी...वाचा सविस्तर...

*बातमी, सर्वांच्या आधी*
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/pune

Intro:Body:

news 2 pm

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.