मुंबई - मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभाग भोंगळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असतो. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. विधी व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन तीन वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही परीक्षा विभागाने तब्बल साडेतीन वर्षे त्यांची गुणपत्रिका दिलेली नाही.
हेही वाचा - विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
विधी, मीडिया स्टडीज व एमसीए अभ्यासक्रमाची परीक्षा काही विद्यार्थ्यांनी तर काहींनी ऑक्टोबर २०१४ मध्ये दिली होती. त्यामध्ये एका विषयात अनुत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी अर्ज केला असता, पुनर्मुल्यांकनात विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना गुणपत्रक मिळाले नाही. गुणपत्रक मिळावे यासाठी विद्यार्थी वारंवार विनंती करत आहेत. मात्र, परिक्षा विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. म्हणून या महिन्यात हे प्रकरण मिटवले नाही तर विद्यार्थी संघटना आक्रमक होत आपला निर्णय घेतील, असे विद्यार्थी भगवान बोयल याने सांगितले.
हेही वाचा - संमोहनाला विज्ञानाच्या परिभाषेत मांडणारे एब्बे फारिया मृत्यूच्या दोनशे वर्षांनंतरही उपेक्षितच
तर याबाबत विद्यापीठात विचारणा केली असता नोंदवहीत चुकीच्या विषयासमोर निकाल लिहिला असल्याचे सांगत थोड्याच दिवसात गुणपत्रिका संबंधित विद्यार्थांना देण्यात येईल, असे सांगण्यात आले. यानंतर थोड्या दिवसांत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना त्यांच्या बदललेल्या निकालाची गुणपत्रिका मिळणे अपेक्षित होते. मात्र, अजूनही हे विद्यार्थी गुणपत्रिकेची वाट पाहत आहे.
हेही वाचा - भरचौकात महिलेची प्रसुती; रुग्णवाहिकेअभावी सायकल रिक्षातून नेल्याने मृत्यू
मुंबई विद्यापीठातील निकालाचा गोंधळ सर्वच अभ्यासक्रमात आहे. यावर आता विद्यापीठ वेगवेगळे कारणे देत आहे. आजही मुलांचे गुणपत्रक मिळाले नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या या समस्येला कंटाळून एखाद्याने जर आत्महत्या केली तर त्याला सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार असेल, असा इशारा या उपेक्षित विद्यार्थांनी दिला आहे. तसेच आता विद्यार्थी शिक्षक आमदारांना व शिक्षण मंत्र्यांना भेटून पुढील दिशा ठरवणार आहेत.