ETV Bharat / state

छात्र भारती संघटनेच्या उपोषणाला यश, विद्यार्थ्यांच्या परीक्षा फी माफीचे परिपत्रक जारी - मुंबई विद्यापीठ

राज्यातील शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे परिपत्रक काढले नव्हते. या मागणीकरता छात्र भारती संघटनेने पत्रव्यवहार करून सोमवारी कलिना संकुलात बेमुदत उपोषण सुरू केले. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी फी माफीचे परिपत्रक जारी केल्यानंतर संघटनेने त्यांचे बेमुदत उपोषण मागे घेतले.

छात्र भारती संघटना
author img

By

Published : Nov 20, 2019, 10:32 AM IST

Updated : Nov 20, 2019, 11:56 AM IST

मुंबई - मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ व्हावे. विद्यापीठाने तत्काळ फी माफीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूज येथील कलिना संकुलात उपोषण केले होते. यावेळी विद्यापीठ प्रशासनाने आज(मंगळवारी) फी माफीचे परिपत्रक जारी केले असल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेतले.

परिपत्रक देताना विद्यापीठ प्रशासन
परिपत्रक देताना विद्यापीठ प्रशासन

राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मुंबई विद्यापीठाने नुकतेच राज्यातील शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याचे परिपत्रक काढले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. यारम्यान, छात्र भारती विद्यार्थी संघटनेने पत्रव्यवहार करून सोमवारी कलिना संकुलात बेमुदत उपोषण सुरू केले. या उपोषणास संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले आणि काही विद्यार्थी बसले होते.

छात्र भारती संघटनेच्या उपोषणाला यश

हेही वाचा - एसटीची विना वातानुकूलित शयन-आसन बस प्रवाशांच्या सेवेत

याप्रकरणी विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी एक परीपत्रक जारी केले. ज्यात विद्यापीठातील वसतीगृह शुल्क लवकरच माफ करण्याचे आश्वासन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला दिले. या आश्वासनानंतर संघटनेने आपले उपोषण मागे घेतले. मात्र, उपोषण स्थगित करताना मुंबई विद्यापीठाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. तर, २२ नोव्हेंबरनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - पालिका शाळांमधील विद्यार्थी वह्यांपासून वंचित, युवासेनेच्या सद्स्याचा सेनेला घरचा आहेर

Intro:
छात्र भारतीच्या संघटनेच्या उपोषणाला यश मुंबई विद्यापीठाने दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीचे परीपत्रक जारी केले

मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ व्हावे आणि तात्काळ विद्यापीठाने फी माफीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने आज मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूज येथील कलिना संकुलात उपोषण केले होते. यावेळी विद्यपीठ प्रशासनाने आज फी माफीचे परिपत्रक जारी केले असल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेतलेBody:
छात्र भारतीच्या संघटनेच्या उपोषणाला यश मुंबई विद्यापीठाने दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफीचे परीपत्रक जारी केले

मुंबई विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त व पूरबाधित विद्यार्थ्यांची प्रवेश फी, ट्युशन फी, परीक्षा फी आणि वसतीगृह शुल्क सरसकट माफ व्हावे आणि तात्काळ विद्यापीठाने फी माफीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी छात्र भारती विद्यार्थी संघटनेने आज मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूज येथील कलिना संकुलात उपोषण केले होते. यावेळी विद्यपीठ प्रशासनाने आज फी माफीचे परिपत्रक जारी केले असल्याने संघटनेने बेमुदत उपोषण मागे घेतले.

मुंबई विद्यापीठाने नुकतेच राज्यातील शिक्षण घेत असलेल्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफीचा निर्णय घेतला होता मात्र त्याचे परिपत्रक काढले नसल्याने विद्यार्थी संभ्रमात होते.यारम्यान छात्र भारती विद्यार्थी संघटनेने पत्रव्यवहार करून आज कलिना संकुलात बेमुदत उपोषण करण्याचा ईशारा देत उपोषणास संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले आणि काही विद्यार्थी बसले होते यादरम्यान विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणेबाबत परीपत्रक जारी करत वसतीगृह शुल्क लवकरच माफ करण्याचे आश्वासन मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांनी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला दिले.आजचे उपोषण स्थगित करताना मुंबई विद्यापीठाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत तर २२ नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलनाचा इशारा छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले यांनी दिलाConclusion:null
Last Updated : Nov 20, 2019, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.