ETV Bharat / state

सोमवारी झालेल्या पडझडीनंतर भारतीय शेअर बाजार सावरला - Indian stock market

देशांतर्गत निर्देशांकांवर आशियाई बाजारात संमिश्र ट्रेंड आहे. जपानच्या निक्केई 225 मध्ये 0.66 टक्क्यांनी, सिंगापूरचे स्ट्रेट टाईम्स 0.57 टक्क्यांनी आणि तैवानचे मार्केट 0. 53 टक्क्यांनी वाढले, तर हाँगकाँगच्या हँग सेन्ग 0.51 टक्क्यांनी खाली, दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.13 टक्के आणि शांघाय कंपोजिटमध्ये 0.34 टक्क्यांनी घसरण झाली.

Indian stock market
भारतीय शेअर बाजार
author img

By

Published : Jun 15, 2021, 12:20 PM IST

मुंबई - शेअर बाजारात सोमवारी झालेल्या पडझडीनंतर बीएसई सेन्सेक्स 52400 आणि निफ्टी 15800 पॉइंट्सच्या वर बंद झाला. आज (मंगळवारी) 15 जूनला सिंगापूरचे एसजीएक्स निफ्टी सिंगापूर एक्सचेंजमध्ये 0.09 टक्क्यांनी घसरला. तर भारतीय शेअर बाजारात आज सुरूवातीच्या व्यापारात बीएसई सेन्सेक्स 0.41 टक्क्यांनी वधारून 216.96 अंकांच्या वाढीसह 52,768.49 अंकांवर पोहोचला. दुसरीकडे, निफ्टी 50देखील 0.32 टक्क्यांनी म्हणजे 57.30 अंकांच्या वाढीसह 15,869.15 अंकांवर आहे. आजच्या व्यापारात गुंतवणूकदारांचे लक्ष अदानी ग्रुप स्टॉक्स, कोल इंडिया, भारती एअरटेल, पीएनबी हाऊसिंग आणि ज्युबिलंट फूडवर्क्सवर असेल.

देशांतर्गत निर्देशांकांवर आशियाई बाजारात संमिश्र ट्रेंड आहे. जपानच्या निक्केई 225 मध्ये 0.66 टक्क्यांनी, सिंगापूरचे स्ट्रेट टाईम्स 0.57 टक्क्यांनी आणि तैवानचे मार्केट 0. 53 टक्क्यांनी वाढले, तर हाँगकाँगच्या हँग सेन्ग 0.51 टक्क्यांनी खाली, दक्षिण कोरियाच्या कोस्पीमध्ये 0.13 टक्के आणि शांघाय कंपोजिटमध्ये 0.34 टक्क्यांनी घसरण झाली.

हेही वाचा - आजपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले - अजित पवार

ट्रेडिंग 14 जूनला सुरुवातीला सेन्सेक्स घसरणीसह सुरू झाले. मात्र, त्यानंतर वसूली झाली आणि सेन्सेक्स दिवसातील नीचांकी पातळीपेक्षा 615 अंकांच्या वाढीसह बंद झाला. तर निफ्टी पहिल्यांदा 15800च्यावर बंद झाला. दोन्ही निर्देशांक वेगाने बंद झाले. 14 जूनच्या व्यापार दिवशी सेन्सेक्स 51,936.31 अंकांनी घसरला होता. मात्र, त्यानंतर तो सुधारला आणि बाजार बंद होताच या पातळीवरून 615.22 अंकांच्या वाढीसह 52,551.53 वर बंद झाला. सेन्सेक्समध्ये 17 समभाग वधारला आणि उर्वरित 13 समभाग खाली बंद झाले. निफ्टी 50 बद्दल बोलायचे झाल्यास तो 0.08 टक्क्यांनी किंवा 12.50 अंकांच्या किरकोळ वाढीसह 15,811.85 वर बंद झाला.

अदानी गृपसाठी ब्लॅक मंडे -

उद्योगपती गौतम अदानींच्या कंपन्यांसाठी सोमवार ट्रेडिंगसाठी ब्लॅक मंडे ठरला. प्रत्यक्षात, गटाच्या 6 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स 5% वरुन 22% पर्यंत घसरले. यात अदानी एंटरप्रायजेसचे सर्वात जास्त शेअर्सचे नुकसान झाले आहे. ते 22% घसरून 1,200 रुपये झाले. शुक्रवारी अदानी इंटरप्राईस 1600 रुपयांवर बंद झाला होता. यामुळे आज सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांचे सुमारे 50,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.