ठाणे - शिवसेनेने आपल्या आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवले आहे. आमदरांची फोडाफोडी करून घोडेबाजार होऊ यासाठी शिवसेनेने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच आदित्य ठाकरे हे हॉटेल ललितमध्ये सोमवार रात्रीपासून ठाण मांडून बसले होते.
हेही वाचा - विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सर्व स्पष्ट होईल - शरद पवार
शिवसेनेचे आमदार हॉटेल ललितमधून निघून लेमन ट्री हॉटेलमध्ये गेले असून याठिकाणी शिवसेनेच्या आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारावरून शिवसेनेने आपल्या आमदारांची सुरक्षा ही फारच गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे हे स्वतः आमदारांवर जातीने लक्ष ठेवून आहेत.