मुंबई - मुंबई ( Mumbai ) क्लायमेट अॅक्शन प्लॅनअंतर्गत 'मुंबई हरित योद्धा' हा उपक्रम राबवला जात आहे. मुंबईत ग्रीन स्पेस निर्माण करताना येथील तापमान, पूरस्थिती आटोक्यात आणून 'इझ ऑफ लिव्हिंग'साठी सरकार प्रयत्न केला जात आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ( World Environment Day ) 'मुंबई हरित योद्धा' या कार्यक्रमात मुंबईकरांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी केले आहे. मुंबई मोकळा श्वास घेणार असून हरित मुंबई ( Mumbai ) हेच सरकारचं स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
'मुंबई हरित योद्धा' उपक्रम - 'मुंबई हरित योद्धा' उपक्रमाचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलं. मुंबईला मोकळा श्वास देण्यासाठी हरित मुंबईचा संकल्प सरकारने केलाय. त्या अंतर्गत मुंबईत सध्या असलेल्या झाडांच्या संख्येत तिप्पट वाढ करण्याचा निर्धार आहे. २०२० मध्ये पालिकेच्या एकट्या के पश्चिम विभागात ६५ हजार झाडे लावली ( Planting trees ) असून येत्या काळात इथे आणखी अडीच हजार झाडे लावण्याचा सरकारचा मानस आहे. त्याच बरोबर शहरात स्वच्छता मोहिमेसोबतच नवी रोपटी देखील लावली जाणार आहेत. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या रस्त्यालगत किती कार्बन उत्सर्जित होईल त्याची पाहणी करून तेवढी झाडे लावली जाणार असून इतरही मुंबईतल्या प्रमुख ५ रस्त्यालगत झाडे लावण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
हरित धोरण राबवण्याचं आवाहन - दरम्यान, या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी मुंबईकरांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे मुंबईकरांना आवाहन केले आहे. त्याच बरोबर हरित ऊर्जा निर्मिती बरोबरच विमानातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर काम करून हरित धोरण अवलंबण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक विमानाच्या प्रवासाबरोबर कार्बन किती उत्सर्जित होतो आणि त्या तुलनेत किती झाडे लावली पाहिजेत याचा आराखडा तयार करून झाडे लावली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कचऱ्याच्या विजेवर चार्जिंग पॉइंट - मुंबईत ८५०० इलेक्ट्रिक कार चार्जिंग सेंटर उभी करण्यासाठी अदानी ग्रुप प्रयत्न करणार आहे. यासाठी सर्व हौसिंग सोसायटीमधील कचरा एकत्र करून त्यापासून वीज निर्माण करून इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट तयार केली जातील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.