ETV Bharat / state

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना पितृशोक; अच्युत उसगावकर यांचे गोव्यात निधन

अभिनेत्री वर्षा उसगावकरचे वडील आणि गोव्याचे माजी मंत्री यांचे गोव्यात निधन झाले. त्यांच्यावर पणजीजवळ एका रुग्णालयात उपचार सुरू होते. अच्युत उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगांवकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली.

अच्युत उसगावकर
अच्युत उसगावकर
author img

By

Published : Jun 16, 2020, 11:59 AM IST

Updated : Jun 16, 2020, 2:11 PM IST

मुंबई - मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडील अच्युत उसगावकर यांचे मंगळवारी गोव्यात निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ९२ वर्षांचे होते. गोवामुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या दिवंगत भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते.

अच्युत उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. अलिकडे ते खूप आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध स्तरांवर शोक व्यक्त करण्यात आला. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून १९६२ साली मुक्तता झाली आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता.

अच्युत उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या दिवंगत शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते.

Last Updated : Jun 16, 2020, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.