ETV Bharat / state

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन; कोणती जबाबदारी मिळणार याकडे लक्ष - urmila matondkar joined shivsena

बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना लहानपणापासून समाजवादी विचारांचे बाळकडू मिळाले. मात्र, त्या राजकारणापासून लांब होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून उत्तर-मुंबई मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली.

Actress urmila matondkar joined shivsena party
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या हाती शिवबंधन
author img

By

Published : Dec 1, 2020, 5:30 PM IST

Updated : Dec 1, 2020, 5:55 PM IST

मुंबई - अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज (मंगळवारी) औपचारिकरित्या शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचा पक्षप्रवेश झाला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आणि सामनाच्या मुख्य संपादिका रश्मी ठाकरे यांच्याहस्ते ऊर्मिला यांना शिवबंधन बांधण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. तर आता त्यांना पक्षात कोणते पद दिले जाणार? त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

याबाबत आढावा घेताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी.

काँग्रेस ते शिवसेना प्रवास -

अभिनेत्री मातोंडकर यांना लहानपणापासून समाजवादी विचारांचे बाळकडू मिळाले. मात्र, त्या राजकारणापासून लांब होत्या. 2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसकडून उत्तर-मुंबई मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणुकही लढवली. मात्र, त्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

लोकसभा निवडणूक हरल्यानंतरही त्या काँग्रेससाठी सक्रिय काम करताना कुठेही दिसल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्या पुढे कोणत्या पक्षात जाणार? काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यानुसार उर्मिला यांनी शिवबंधन बांधणार याची चर्चा रंगू लागली. मात्र, ज्यावेळी त्यांचे नाव शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी गेले. त्यानंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार, हे स्पष्ट झाले. त्यानुसार आज त्यांनी अखेर शिवबंधन हाती बांधले.

हेही वाचा - LIVE : उर्मिला मातोंडकर पत्रकार परिषद : "महाविकास आघाडीचं काम वाखाणण्याजोगं"

आता काय जबाबदारी मिळणार याकडे लक्ष?

उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. मात्र, आता कोणती जबाबदारी देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या येण्याने शिवसेनेच्या महिला आघाडीला आता बळकटी मिळेल अशी चर्चा आहे.

Last Updated : Dec 1, 2020, 5:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.