मुंबई : देशभरात आज ईद साजरी होत आहे. सुपरस्टार सलमान खान आणि आमिर खान यांनी शुक्रवारी रात्री ईद 2023 चे एकत्र स्वागत करत सेल्फी काढला आहे. चांद मुबारक असे कॅप्शन देवून सलमानने इंस्टाग्रामवर तो फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सलमान ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक जीन्स घातलेला दिसत आहे. दुसरीकडे आमिरने कॅज्युअल ब्लू टी-शर्ट घातला आहे. भाईजान आणि आमिर खानचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चाहत्यानी असे केले कमेन्ट: आमिर आणि सलमानला एकत्र पाहून चाहत्यांना 'अंदाज अपना अपना' चित्रपटातील अमर प्रेम आठवले आहे. तर दोन्ही सुपरस्टारच्या चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला. यामध्ये चाहत्याने म्हटले आहे की, तुम्ही चांद आहात. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, एका फ्रेममध्ये दोन दिग्गज. तसेच आणखी एका चाहत्याने लिहिले की, वू सलमान सर तुम्ही आणि अमीर सर सुंदर दिसत आहात माशाअल्लाह दरम्यान, काही चाहत्यांनी ही संधी साधून आमिर आणि सलमान स्टारर सुपरहिट चित्रपट अंदाज अपना अपना 2ची मागणी केली. आणखी एका यूजरने लिहिले की, आम्हाला अंदाज अपना अपना 2 हवा आहे. अमर-प्रेम पुन्हा एकत्र, एका चाहत्याने लिहिले. आणखी एका चाहत्याने लिहिले, सलमान खान आमिर खान अंदाजा अपना अपना कन्फर्म आहे.
1994 मध्ये रिलीज अंदाज अपना अपना: काही चाहत्यांनी विचारले आहे की 'अंदाज अपना अपना 2' तयार आहे का? 1994 मध्ये रिलीज झालेल्या 'अंदाज अपना अपना'मध्ये सलमान आणि आमिरची जोडी खूप आवडली होती. या चित्रपटात सलमानने प्रेम आणि आमिरने अमरची भूमिका केली होती. तर सलमानचा कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' या शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळात आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित, या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी आणि व्यंकटेश दग्गुबती यांनीही प्रमुख भूमिका केल्या होत्या. तो पुढे कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. यावर्षीच्या दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी तयार आहे. दुसरीकडे, आमिर शेवटचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटात करीना कपूर खानसोबत दिसला होता. त्याच्या पुढील चित्रपटाची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे.