ETV Bharat / state

Shah Rukh Khan : शाहरुख खानवर यापूर्वीही झाली होती कस्टम विभागाकडून कारवाई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून शाहरुख खानची तासभर चौकशी ( Shah Rukh Khan was interrogated customs department ) करण्यात आली. कस्टम ड्युटी न भरल्याबद्दल विभागाने शाहरुख आणि त्याच्या टीमची चौकशी ( Shahrukh and his team investigate ) केल्याचे समजते.शाहरुख खानच्या बॅगेत महागड्या घड्याळांचे ( Expensive watch in Shah Rukh Khan bag ) रिकामे बॉक्स सापडल्यानंतर शाहरुखची चौकशी करण्यात आली.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan
author img

By

Published : Nov 12, 2022, 8:12 PM IST

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानला ( Bollywood superstar Shah Rukh Khan ) मुंबई विमानतळावर कस्टम विभागानने ( Shah Rukh Khan interrogated customs department ) शुक्रवारी रात्री अडवले होते. विमानतळावर तैनात एअर इंटेलिजेंस युनिट म्हणजेच एआययूच्या सूत्रांनी सांगितले की, शाहरुख खान शुक्रवारी रात्री शारजाहून परतला होता. त्याच्याकडे महागडी 18 लाख रुपायांची घड्याळे होती. या घड्याळांसाठी शाहरुखला ६.८३ लाख रुपये कस्टम ड्युटी ( Shah Rukh Khan paid customs duty ) भरावी लागली.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

शाहरुख खानकडे महागाडी घड्याळे - शाहरुख खान शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईला पोहोचला. पहाटे एक वाजताच्या सुमारास येथील टी-३ टर्मिनलवर रेड चॅनल ओलांडत असताना शाहरुख खानसह त्याची टीम कस्टमने थांबवली. त्याच्या बॅगेत बाबून, झुर्बक घड्याळाची तपासणी केली असता, रोलेक्स घड्याळाचे 6 बॉक्स, स्पिरिट ब्रँडचे घड्याळ, ऍपल सिरीजची घड्याळे आढळून आली. यासोबत घड्याळांचे रिकामे बॉक्सही सापडले होते. शाहरुख खान शनिवारी पहाटे 5 वाजता चौकशी झाल्यानंतर मुंबई विमानतळातून बाहेर पडला. त्यांच्यासोबत त्याची व्यवस्थापक पूजा ददलानी देखील होती.

अंगरक्षकाने दंड भरला- विमानतळावर तासाभराच्या ऑपरेशननंतर शाहरुख, त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना जाण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र शाहरुखचा अंगरक्षक रवी तसेच टीमच्या इतर सदस्यांना ताब्यात घेण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवीने 6 लाख 87 हजार रुपये कस्टम ड्युटी भरली. सीमाशुल्क विभागाची ही प्रक्रिया शनिवारी सकाळपर्यंत चालली. सकाळी आठच्या सुमारास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कस्टम अधिकाऱ्यांनी रवीची सुटका केली. दंडाची रक्कम शाहरुखच्या क्रेडिट कार्डवरूनच भरण्यात आल्याचेही अनेक रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

पुस्तक लाँचसाठी किंग खान गेला होता दुबईला - शाहरुख 11 नोव्हेंबरला यूएईमधील एक्स्पो सेंटरमध्ये पोहोचला. शारजाह इंटरनॅशनल बुक फेअर 2022 च्या 41 व्या आवृत्तीत भाग घेतल्याबद्दल त्यांना ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा आणि कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शाहरुखने त्याच्या टीमला एका खासगी चार्टर्ड विमानातूनही नेले. या विमानाने ते शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता मुंबईला परतले.

या आगोदरही किंग खानवर कारवाई - 2011 मध्ये देखील शाहरुख खानला मुंबई विमानतळावर कस्टमने थांबवले होते. त्याच वेळी, 2009, 2012, 2016 मध्ये त्याला अमेरिकेच्या तीन वेगवेगळ्या विमानतळांवर थांबवण्यात आले आहे. मात्र, शाहरुखला परदेशी विमानतळांवर थांबवण्यामागचे कारण सुरक्षा तपासणी हे होते.

2011- मुंबई विमानतळ - 2011 मध्ये शाहरुख खान आपल्या कुटुंबासह लंडन, हॉलंडच्या सहलीला गेला होता. शाहरुख जेव्हा मुंबईला परतला तेव्हा त्याला कस्टम अधिकाऱ्यांनी विमानतळावर थांबवले. त्याची अनेक तास चौकशी करण्यात आली. त्याच्या ताब्यातील अघोषित सामानासाठी दंड म्हणून दीड लाख रुपये जमा केल्यानंतरच त्याला विमानतळाबाहेर येण्याची परवानगी देण्यात आली.

2009 - न्यूयॉर्क विमानतळ - शाहरुख खानला 2009 मध्ये न्यूयॉर्क विमानतळावर थांबवून तासनतास त्याच्या सामानाची झडती घेण्यात आली होती. याचे कारण म्हणजे शाहरुख खान हे देखील दहशतवाद्याचे नाव होते आणि त्यावेळी गुगल सर्चमध्ये दहशतवाद्याच्या प्रोफाईलसोबत शाहरुख खानचा फोटो दिसत होता. मात्र, नंतर ही त्रुटी दूर करण्यात आली.

2012 - न्यू जर्सी विमानतळ - 2012 मध्ये अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात भाषण देण्यासाठी निघालेल्या शाहरुखला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी न्यू जर्सी विमानतळावर दोन तास थांबवले होते. त्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र कार्यालयानेही याबाबत माफी मागितली होती. या घटनेवर शाहरुख म्हणाला होता की, 'माझी तपासणी करायला हरकत नाही, पण विमानतळावर तासनतास वाट पाहणे आणि तेही विनाकारण त्रासदायक आहे. जर परिस्थिती बिघडली, तर भारतातही अशीच सुरक्षा असावी असे म्हणणारा तो पहिला व्यक्ती असेल. त्यांना (अमेरिकनांना) माझ्या नावाची समस्या असू शकते, परंतु मी त्यांच्या शोध यादीत नाही.

2016 लॉस एंजेलिस विमानतळ - अमेरिकेतच 2016 मध्ये शाहरुखला लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आले होते. खुद्द शाहरुखने ट्विट करून ही माहिती दिली. त्याला थांबवण्यात आले तेव्हा त्याच्यासोबत मुलगी सुहाना आणि मुलगा आर्यन खान होते. त्यावेळी शाहरुख चित्रपटाच्या शूटिंगसाठी यूएस टूरवर गेला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.