ETV Bharat / state

Nusli wadia murder case : मुकेश अंबानींना वाचवण्याचा सीबीआयचा प्रयत्न, आरोपीचा न्यायालयात दावा

उद्योगपती मुकेश अंबानी यांना खटल्यात साक्ष देण्यासाठी पाचारण करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली केली होती. यावर सुनावणी दरम्यान आरोपी इव्हान सिक्वेरा न्यायालयाकडे अर्जाद्वारे म्हटले आहे. हा खटला 1988-89 मध्ये रचलेल्या वाडियाच्या हत्येच्या कटाशी संबंधित आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी कीर्ती अंबानी हे मुख्य आरोपी होते.

सीबीआय
सीबीआय
author img

By

Published : Aug 3, 2022, 11:00 AM IST

मुंबई - व्यावसायिक शत्रुत्वामुळे बॉम्बे डाइंगचे तत्कालीन प्रमुख नस्ली वाडिया यांच्यावर 1989 मध्ये झालेल्या हत्येचा कथित कट रचण्यात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी सहभागी असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे, असा दावा या खटल्यातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने केला आहे. प्रकरणाच्या तपासाला आणि खटल्याला लागलेला विलंब लक्षात घेता प्रभावशाली व्यक्तींना संरक्षण देण्यासाठीच सीबीआयने प्रकरणाचा तपास हाती घेतल्याचे सिक्वेराने मुंबई सत्र न्यायालयात केलेल्या अर्जात म्हटले आहे. सीबीआयचे वतीने विशेष सरकारी वकील मनोज चालदन यांनी सिक्वेरा यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवला असून या टप्प्यावर आता उद्योगपती मुकेश अंबानी यांना फिर्यादी साक्षीदारास बोलावू शकत नाही, असे न्यायालयासमोर सांगितले आहे. आता या याचिकेवर पुढील 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.

वाडियाच्या हत्येच्या कटाशी संबंधित - आरोपीने प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना खटल्यात साक्ष देण्यासाठी पाचारण करण्याची मागणी विशेष न्यायालयाकडे केली केली होती. यावर सुनावणी दरम्यान आरोपी इव्हान सिक्वेरा न्यायालयाकडे अर्जाद्वारे म्हटले आहे. हा खटला 1988-89 मध्ये रचलेल्या वाडियाच्या हत्येच्या कटाशी संबंधित आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी कीर्ती अंबानी हे मुख्य आरोपी होते. ज्यांनी थेट मुकेश अंबानींना तक्रार केली होती.

वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष - अंबानी यांना आरोपी करण्यापासून तसेच 1990 मध्ये त्यांनी नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे त्यांच्याविरोधात तपास करण्यापासून सीबीआयला कोण रोखत आहे, असा प्रश्नही सिक्वेराने उपस्थित केला आहे. मुकेश अंबानी हेच या कथित कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचे आणि सीबीआय रिलायन्सच्या पिंजऱ्यातील पोपट झाले आहे, असा आरोपही त्याने केला आहे. या प्रकरणी वाडिया यांची साक्ष नोंदवण्यात आली होती. त्याचा आणि अंबानी यांनी 1990 मध्ये सीबीआयला दिलेल्या जबाबाचा विचार केल्यास उद्योगपतीच्या आदेशानुसार सहआरोपी कीर्ती अंबानी याने वाडिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा निष्कर्ष काढता येईल, असा दावा सिक्वेरा यांना न्यायालयात केलेल्या अर्जात केला आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, 2016 मध्ये साक्ष देताना वाडिया यांनी न्यायालयासमोर दिलेले विधान अंबानी यांनी 1990 मध्ये सीबीआयला दिलेल्या निवेदनाशी जोडले गेले, तर असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. त्यांच्या सहआरोपी कीर्ती अंबानीने वाडियाच्या हत्येचा कट रचनासाठी उद्योगपतीच्या निर्देशानुसार काम केले होते.

यांच्यावर कट रचल्याचा आरोप - 1989 मधील प्रकरणातील आरोपी इव्हान सिक्वेरा याने विशेष सीबीआय न्यायालयासमोर अर्ज केला आहे. त्यात त्याने अंबानी यांना साक्षीदार म्हणून पाचारण करण्याची आणि त्यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने 2003 मध्ये कीर्ती अंबानी, अर्जुन बाबरिया, सिक्वेरा आणि रमेश जगोठिया यांच्यावर वाडिया यांच्या हत्येसाठी कथित कट रचल्याचा आरोप निश्चित केला होता. या आरोपींपैकी दोघांचा खटला प्रलंबित असतानाच मृत्यू झाला होता. तर अन्य 2 आरोपी जामिनावर आहेत.

कीर्ती अंबानी हा अंबानी समूहाच्या मालकीच्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे म्हटले जात होते. तसेच त्याच्यावर गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप होता. कीर्तीचा 2017 मध्ये मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 2016 मध्ये वाडिया हे साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान आपणच खरे पीडित आहोत, असा दावा सिक्वेराने केला असून कटासंदर्भात माहिती देण्यास तयार असल्याचे त्याने म्हटले आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी - रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी दिवंगत कीर्ती अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्या जवळचे मानले जाणारे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी होते. न्यायालयाने 1988-89 मध्ये कीर्ती अंबानी, अर्जुन बाबरिया, सिक्वेरा आणि रमेश जागोथिया या तिघांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवला होता. 1990 मध्ये मुकेश अंबानी यांनी सीबीआयला दिलेल्या निवेदनात बॉम्बे डाईंगचा प्रतिस्पर्धी असल्याचा आरोप नाकारला होता आणि दावा केला होता. त्यांना कीर्ती अंबानींच्या संभाव्य सहभागाबद्दल फक्त त्यांच्या अटकेबद्दल माहिती मिळाली होती. जून 2016 मध्ये नुस्ली वाडिया म्हणाले की, मी कीर्ती अंबानींना ओळखत नाही. परंतु, त्यांनी RIL साठी काम केले असल्याची माहिती मिळाली. धीरूभाई अंबानी आणि त्यांच्या मुलांनी व्यवस्थापित केलेल्या रिलायन्समध्ये कर्मचारी असल्याशिवाय कीर्ती अंबानी आपल्याविरुद्ध का कट रचतील हे मला माहीत नाही असेही त्यांनी सांगितले आहे.

सीबीआयचे आरोप - सीबीआयचे आरोप आहे की, आरोपींनी वाडियाला त्याच्या प्रभादेवी निवासस्थानी परत जाताना अडवण्याची योजना आखली होती. सध्याचा अर्जदार सिक्वेरा याला वाडियाचे फोटो दाखविण्यात आले होते. आणि गुन्हा करण्यासाठी त्याने मोठी रक्कम दिली होती. पण ही योजना प्रत्यक्षात येण्यापूर्वीच 2 आरोपींना अटक करण्यात आली. कीर्ती अंबानी यांच्यावर गुन्ह्यासाठी भडकावण्याचा आणि प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जुलै 1989 मध्ये देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगल्याबद्दल रमेश जागोथिया यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - CNG- PNG Price Hike: महागाईचा भडका! सीएनजी 6 तर पीएनजीच्या दरात 4 रुपयांची पुन्हा वाढ

हेही वाचा - Andhra Pradesh Gas Leak : आंध्र प्रदेशातील अनकापल्ली येथील कंपनीत गॅस गळती, 50 जणांची प्रकृती गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.