मुंबई- बलात्काराच्या प्रकरणातील आरोपीने दिंडोशी सत्र न्यायालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. विकास पवार असे त्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी विकासला दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. यावेळी आरोपीने त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका देऊन इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
काय आहे प्रकरण -
२०१५ साली आत्महत्या केलेल्या आरोपी विकास पवार याने मुंबईतील पवई परिसरात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. या प्रकरणी आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. आरोपी विकास पवार याला ऑर्थर रोड तुरुंगातून दिंडोशी सत्र न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी ही घडना घडली.