ETV Bharat / state

मुंबई : आर्थररोड जेलमध्ये बंद आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

आर्थररोड जेलमधील आरोपीने पॅन्टच्या अल्युमिनियम बटनाला धार काढून हातावर वार केले. तसेच अंडर पॅन्टच्या इलास्टिकने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.

arthur Road Jail latest news
मुंबई : आर्थररोड जेलमध्ये बंद आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
author img

By

Published : May 24, 2021, 3:22 PM IST

मुंबई - आर्थररोड जेलमध्ये एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने पॅन्टच्या अल्युमिनियम बटनाला धार काढून हातावर वार केले. तसेच अंडर प‌ॅन्टच्या इलास्टिकने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. नाज अयुब खान, असे या आरोपीचे नाव आहे.

याआधीही पळून जाण्याचा प्रयत्न -

दरम्यान, 3 डिसेंबर 2020 रोजी न्यायालयाने त्याची रवानगी आर्थररोड जेलमध्ये केली होती. तसेच 16 एप्रिल रोजी या आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याला क्वारंटाईन केले होते. तेथून ही त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या या कृत्यामुळे त्याला अतिसुरक्षा विभागात ठेवण्यात आले होते. त्याला इतर यार्डात ठेवण्यात यावे म्हणून त्याने हे कृत्य केल्याची माहिती आहे. कारागृहातील वैद्यकीय अधिकारी त्याच्यावर उपचार करत आहेत.

हेही वाचा - म्यूकरमायकोसिस! ऐका... रुग्णांचे डोळे काढणाऱ्या डॉक्टरांचे अनुभव अन् सल्ले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.