मुंबई- डोंगरी पोलिसांनी एमडी, हे अमली पदार्थ बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. दीपक संजीव बंगेरा (वय ५५) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून १२ कोटी ५० लाख रुपयांचे २५ किलो एमडी जप्त केले आहे. याबरोबरच अटक केलेल्या आरोपीकडून 5 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
18 फेब्रुवारी रोजी मुंबईतील डोंगरी परिसरामध्ये करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान इकबाल हुसेन सय्यद या आरोपीला 12 ग्राम एमडी या अमली पदार्थासह अटक करण्यात आली होती. या आरोपीच्या चौकशीमध्ये अब्दुल वसीम अब्दुल अजीज शेख (वय 36) या आरोपीबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यास नवी मुंबईतील वाशी येथून अटक करण्यात आली. पोलिसांना त्याच्या ताब्यात 56 ग्राम एमडी अमली पदार्थ मिळून आले होते.
हेही वाचा - मुंबई : वाहतूक पोलिसाच्या मदतीने हरवलेले सोने मिळाले परत
दोन्ही आरोपींच्या चौकशीत मुंबईतील घाटकोपर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे वितरण करणाऱ्या दीपक संजीव बंगेरा या आरोपीचे नाव समोर आले होते. त्यानंतर बंगेरा यास सांताक्रुज परिसरातील कलिना व्हिलेज येथील एका इमारतीतून मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबई : वाहतूक पोलिसाच्या मदतीने हरवलेले सोने मिळाले परत