ETV Bharat / state

Worli Rape Case : वरळीत 20 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक - चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार

मुंबईतील वरळी भागात 20 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Worli Rape Case
वरळी बलात्कार प्रकरण
author img

By

Published : Jan 23, 2023, 4:48 PM IST

मुंबई : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या वरळी भागात अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुरडीवर एका 35 वर्षीय नराधामाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरळी पोलिसांनी काल आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

चिमुरडीवर नराधमाचा बलात्कार : वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली असताना आरोपीने मुलीला आपल्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेची आई परत आल्यावर मुलगी रडत असल्याने तिला काही तरी संशय आला. तिने मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या आईने जवळचे पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आज कारवाई केली आणि आरोपीला काल अटक करण्यात आली, असे परळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

गतिमंद मुलीवर झाला होता बलात्कार : घाटकोपर परिसरातही यापूर्वी गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच माहिती आणि हात करायचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने तंत्रज्ञान कायदा कलम ६६ई आणि ६७बी ही कलमेही लावण्यात आली होती.

बालसुधार गृहात रवानगी : घाटकोपर परिसरात घडलेल्या घटनेने घबराहाट पसरली असतानाच आता वरळी परिसरात देखील या घटनेने खळबळ उडाली आहे. वरळी प्रकरणात ओळखीच्याच व्यक्तीने 20 महिन्यांच्या चिमुकलीला आपल्या घरी नेऊन वाईट कृत्य केल्याचे निदर्शनास आले आहे. तर घाटकोपर येथे तीन अल्पवयीन मुलांनी गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर वायरल केल्याची माहिती मिळली. शुक्रवारी दुपारी पीडित मुलीच्या वडिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाख केला. पोलिसांनी त्यानंतर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी डोंगरीतील बाल सुधारगृहात केली आहे.

घाटकोपर बलात्कार प्रकरण : पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, मी रिक्षा चालवतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पनातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पीडित मुलगी पायाने अपंग आहे. ती घरीच असते. तिला बोलता देखील येत नाही. १३ जानेवारीला रात्री १० वाजेचे सुमारास पीडितेचे वडील हे रिक्षा अंधेरी येथून खारघर नवी मुंबई येथे घेवून जाताना त्यांच्या मित्राने त्यांना घटनेबद्दल माहिती दिली.

हेही वाचा : Pune Crime : खऱ्या पोलिसाकडेच बदलीसाठी पैशाची मागणी, बनावट पोलीस अधिकाऱ्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.