मुंबई : तक्रारदाराला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या कुलाबा पोलीस ठाण्याचे (Colaba Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पेठकर आणि पोलीस नाईक विलास भांडकोळी यांना एसीबीने रंगेहाथ लाच घेताना अटक केली आहे.
सापळा रचून अटक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईत २ पोलीसांविरोधात कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलीसांनी तक्रारदाराकडून १ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. लाचेचा पहिला भाग म्हणून ३० हजार स्वीकारताना दोन पोलिसांना एसीबीने सापळा रचून अटक केली (ACB arrested police while taking bribe) आहे.
गुन्हा नोंद : पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, तक्रारदार यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून या गुन्हयात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी यातील आरोपी असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक पेठकर याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी (ACB arrested police) केली.
रंगेहाथ पकडले : पेठकर याने मागणी केलेली लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने २८ नोव्हेंबरला तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात हजर राहून लेखी तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने १५ डिसेंबरच्या पडताळणी दरम्यान आरोपी पेठकर याने पंचासमक्ष १ लाख लाचेची मागणी करून आरोपी पोलीस विलास भांडकोळी याच्याकडे लाचेच्या रक्कमेचा पहिला हप्ता देण्यास सांगितले. त्याप्रमाणे विलास भांडकोळी याने ३० हजार लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. म्हणून दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला (arrested police while taking bribe) आहे.