मुंबई - भारतातील पहिल्या वतानुकुलीत लोकल रेल्वेला चांगला प्रतिसाद मिळाला असून तब्बल 38 कोटी रुपयांचे उत्पन्न पश्चिम रेल्वे विभागाला प्राप्त झाले आहे. नाताळच्या मुहूर्तावर (25 डिसेंबर 2017) भारतातील पहिली वतानुकुलीत लोकल रेल्वे सुरू करण्यात आली होती. दोन वर्षात 91 लाख 62 हजार प्रवाशांनी यातून प्रवास केला.
हेही वाचा - नोटीसशिवाय राजीनामा देण्याची परवानगी द्या; एअर इंडियाच्या वैमानिकांची मागणी
पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार दरम्यान सुरू असलेल्या वातानुकुलीत लोकलच्या 14 सप्टेंबरपासून शनिवार व रविवारीही फेऱ्या सुरू केल्याने ती सातही दिवस प्रवाशांच्या सेवेत हजर असते. सध्या या लोकलचे कमीत कमी भाडे हे 60 रुपये इतके आहे. चर्चगेट ते विरार हे अंतर पार करण्यासाठी 205 रुपये एकेरी प्रवासाला मोजावे लागतात. उन्हाळ्यात या लोकलला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने एप्रिलमध्ये 1 लाख 84 हजार रुपये इतके उत्पन्न पश्चिम रेल्वेला मिळाले होते.
मुंबईकर प्रवाशांकडून वतानुकुलीत लोकलची मागणी गेली कित्येक वर्षे होत होती. त्यानंतर लोकांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आणि पश्चिम रेल्वेवर मार्गावर पहिली वातानुकुलीत लोकल रेल्वे सुरू झाली. लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासाठी यंदा दुसरी वातानुकुलीत लोकलही पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. आता मध्य रेल्वे मार्गावरही नवीन वर्षांत वातानुकुलीत लोकल सुरू होणार आहे.
वातनुकुलीत लोकल रेल्वेचे प्रवासी व उत्पन्न -
वर्ष 2017-18
तिकीट - 68618 प्रवासी - 69990
तिकीट - 13617 प्रवासी - 658630
एकूण 82235 एकूण - 728620
एकूण उत्पन्न - 31840692
वर्ष 2018 -19
एकूण उत्पन्न प्रवासी तिकीट - 50000186
एकूण उत्पन्न = 189038453