ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या बाबरी मशीद विद्ध्वंस समर्थनामुळे घटक पक्ष नाराज; शरद पवारांना लिहिणार पत्र

author img

By

Published : Mar 4, 2021, 12:14 PM IST

Updated : Mar 4, 2021, 12:24 PM IST

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. त्यावेळी बोलताना त्यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या कृतीचे समर्थन केले. यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये नाराजी आली आहे.

Sharad Pawar
शरद पवार

मुंबई - विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेचे समर्थन केल्याने महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष नाराज आहेत. 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' या पद्धतीवर सरकार स्थापन झाले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे ही गंभीर आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी सांगितले.

काय आहे प्रकरण -

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. अत्यंत आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट हिंदुत्व, बाबरी मशीद मुद्दयावरून भाजपला फैलावर घेतले. मात्र, आघाडीतील घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने या मुद्द्यावर आपली नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीचे घटक पक्ष नाराज -

भाजपला थांबवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली होती. उद्धव ठाकरे हे विसरले आहेत की, ते मुख्यमंत्री आहेत. बाबरी मशीद पाडणे ही क्रिमिनल अ‌ॅक्टिव्हिटी आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला होता. त्यानुसार हे सरकार स्थापन झाले. मात्र, उद्धव ठाकरेंना या गोष्टींचा विसर पडला आहे. हे सरकार मंदिर-मशीद पाडण्याची गोष्ट करत आहे. मुस्लिम समजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत बोलले पाहिजे. मुस्लिम आरक्षण कधी देणार, सीएए, एनआरसीचे काय झाले, मुस्लिम मंत्र्यांनी लाज बाळगून राजीनामा दिला पाहिजे, असे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी म्हणाले. याबाबत शरद पवार यांच्याकडे आपण पत्र व्यवहार करणार आहोत, असेही आझमी यांनी विधानभवनातील मिडिया हाऊसमध्ये सांगितले.

Last Updated : Mar 4, 2021, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.