ETV Bharat / state

अभिषेक विचारे यांची 'नेव्हर आस्क फॉर अ किस' ही दुसरी कादंबरी प्रकाशित - दुसरी कादंबरी प्रकाशित

NEVER ASK FOR A KISS: आजचे तरुण प्रेयसी प्रियकर प्रेमाच्या अवघड मार्गावर कसे मार्गक्रमण करतात. हे श्रिष्टी प्रकाशित 'नेव्हर आस्क फॉर अ किस' या कादंबरीत अधोरेखित करण्यात आले असून या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. अभिषेकने लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लेखनाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे.

NEVER ASK FOR A KISS
NEVER ASK FOR A KISS
author img

By

Published : Nov 20, 2022, 4:58 PM IST

मराठी जगतात इंग्रजीचा वापर वाढताना दिसतोय. अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांची नावे इंग्रजी असून आता मराठी पुस्तकांची नावेसुध्दा इंग्रजी असताना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे 'नेव्हर आस्क फॉर अ किस'. नवोदित लेखक म्हणून नावारूपास आलेले अभिषेक भास्कर विचारे त्यांच्या दुसऱ्या कादंबरीसह वाचकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आजचे तरुण प्रेयसी प्रियकर प्रेमाच्या अवघड मार्गावर कसे मार्गक्रमण करतात. हे श्रिष्टी प्रकाशित 'नेव्हर आस्क फॉर अ किस' या कादंबरीत अधोरेखित करण्यात आले असून या कादंबरीचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. अभिषेकने लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून लेखनाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. ते प्रसिद्ध समूह, रिचमंड इंडियाचे प्रमुख आहेत.

मार्केटिंग, व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या अभिषेककडे लंडन युनिव्हर्सिटीमधून मोबाईल आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये एमएस केले आहे. अभिषेक यांच्या पहिल्या कादंबरीने महामारीच्या काळात उत्तम विक्री नोंदवली आणि ती २०२० मधील बेस्टसेलर बनली. संकटातही आयुष्यातील एक भाग आपल्याला आनंद देऊन जातो. अभिषेक यांनी आपल्या नवीन कादंबरीत प्रेम, आत्मशोध आणि समजूतदार या नातेसंबंधांच्या विविध छटा वाचकांसाठी आणल्या आहेत.

नेव्हर आस्क फॉर अ किस’ ही प्रेम आणि आपल्या निवडीद्वारे एकमेकांशी जोडलेल्या लोकांची कथा आहे. लेखकाने संमतीच्या संवेदनशील विषयाला नव्या दृष्टीकोनातून स्पर्श केला आहे. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने लेखक, अभिषेक भास्कर विचारे म्हणाले, माझ्या पहिल्या पुस्तकाने मिळवलेल्या यशाने मला अशा कथा शोधण्यास आणि सांगण्यास प्रोत्साहित केले आहे. ज्यात वाचक स्वतःला शोधू शकतात. माझे दुसरे पुस्तक प्रेमाच्या कथेच्या पलीकडचे आहे. ते वाचकाला पृष्ठभागापेक्षा खोलवर जाण्यास आणि नातेसंबंधांच्या विविध पैलूंबद्दल विचार करण्यास भाग पाडेल.

या कादंबरीतील पात्रं सामान्य आहेत. ज्यांच्याबद्दल तुम्हाला वादातीत भावना वाटू शकतात. आता या नवीन कादंबरीला वाचक कसा प्रतिसाद देतात, हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे. बाजारात केवळ एका पुस्तकासह प्रचंड फॅन फॉलोइंग गोळा करून लेखक समुदायात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या या लेखकाकडून वाचक अधिक अपेक्षा नक्कीच ठेवू शकतात.

अभिषेक विचारे यांची 'नेव्हर आस्क फॉर अ किस' ही दुसरी कादंबरी प्रकाशित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.