ETV Bharat / state

शेकडो कोटींचे बजेट असूनही 'मुंबई' तुंबतेच कशी?; 'आप' चा सवाल - मुंबई तुंबतेच कशी आपचा सवाल

मुंबईचा स्ट्रोम वॉटर ड्रेन हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. शेकडो कोटींचे बजेट असूनही 'मुंबई' तुंबतेच कशी, असा प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे.दर वर्षी शेकडो कोटींचे बजेट असून देखील 2 दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबई झाल्याचे आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे.

Aap asked question  on waterlogging in Mumbai
मुंबई' तुंबतेच कशी? आपचा सवाल
author img

By

Published : Jul 6, 2020, 9:25 AM IST

मुंबई- शेकडो कोटींचे बजेट असूनही 'मुंबई' तुंबतेच कशी, असा प्रश्न आम आदमी पक्षाने उपस्थित केला आहे." मुंबईचा स्ट्रोम वॉटर ड्रेन हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी 1062 कोटी इतका फंड आतापर्यंत उपलब्ध केला गेला आहे. हे पैसे नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी झाली पाहिजे" अशी मागणी आपचे राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस यांनी केली आहे.

महापालिकेतर्फे मुंबईतील नागरिकांची दरवर्षी फक्त आश्वासनांवर बोळवण केली जाते. पावसाळ्यात सकल भागात साचणाऱ्या पाण्याला पंपिंग द्वारे बाहेर काढण्यासाठी दर वर्षी शेकडो कोटींचे बजेट असून देखील 2 दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबईची तुंबई झाली आहे. महापालिकेने केलेले सर्व दावे यावेळी फोल ठरले आहेत. एवढे पैसे खर्च करून देखील वर्षानुवर्षे हीच परिस्थिती राहण्यामागे महापालिकेचा गैरकारभारच असल्याचा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला आहे.

'आप'चे राज्य सह-संयोजक किशोर मंध्यान म्हणाले " 2005 च्या प्रलयानंतर अनेक आश्वासने महापालिकेने दिलीत. महापालिकेकडे पैशांची कमी नसून इच्छाशक्तीची कमी आहे. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे मलेरिया व डेंगू सारखे रोग होण्याची शक्यता आहे. एस. व्ही. रोडवर याही वर्षी पाणी तुंबले आहे. महापालिकेने या बाबतीत कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे."

" कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना आता तुंबलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास महापालिका याही वर्षी अपयशी ठरली आहे", असे आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.