2:27 नंदुरबार - जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे....जिल्ह्यातील धरणे ओवरफ्लो... दुर्गम भागातील खेडे गावांना जोडणारा फरशी पूल पुरामुळे वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे... नाल्यांनाही महापूर 2.19 रायगड - कोकण रेल्वे रुळावर पेण येथे दरड कोसळली, दोन तासांनी दरड काढल्यानंतर कोकण रेल्वे वाहतूक सुरू
2.15 मुंबई - पोटातून कोकेनच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक
कोकेनने भरलेल्या 60 कॅप्सूल पोटातून काढल्या.. एअर इंटेलिजन्स पथकाची कारवाई.. वेणूझुआलाच्या 26 वर्षीय आरोपीला नागरिकाला अटक... जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये... आरोपी तरुणाला 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या 6 दिवसात त्याच्या पोटातून कोकेनच्या 60 कॅप्सूल सापडल्या आहेत...ब्राझीलमधून कोकेन ड्रग मुंबईत आणल्याची माहिती...
1:13 सांगली - कोयना धरणाचे सहा दरवाजे 11 फुटांनी उघडले.... कोयना नदीत 41 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे...धोम धरणातून कृष्णेत 30 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे... कोयना धोम धरणातून कृष्णेत 71 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग... सांगलीत पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता...
1.50 मुंबई - धारावीच्या राजीव गांधी परिसरात झोपडपट्टीच्या मागे असलेल्या खाडीच्या पाण्यात 23 वर्षीय तरुण वाहून गेला. राजा मेहबूब शेख असे बेपत्ता तरुणाचे नाव... अग्नीशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल...अद्याप तरुणाचा शोध लागलेला नाही
गोंदिया 1.25 - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हा बोलेरोला धडकली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
12:37 रायगड - पेणमधील दुष्मी (खारपाडा) गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या बंद, दरड बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
वसई-विरार - महापारेषणच्या वसई येथील १००MVA उपकेंद्रात पाण्याची पातळी वाढली असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या सबस्टेशन मधील विद्युतयंत्रणा सकाळी ०६.३० वा. बंद करण्यात आली आहे. यामुळे महावितरणचे वसई, गिरीज, संदोर, कौलार, नवघर औद्योगिक वसाहत, सातीवले औद्योगिक वसाहत, अग्रवाल औद्योगिक वसाहत, सनसिटी, वसई पश्चिम, मानवेलपाडा आदी परिसरातील सुमारे दीड लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.
12:38 मुंबई - अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. भातसा रिव्हर क्रॉसिंगला धसई व आसनगाव फिडरला पाणी लागल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहापूर स्वीचिंगमध्ये पाणी घुसले आहे. गुजराथी बाग शहापूर येथे पाणी घुसल्याने मीटरला पाणी टेकत असल्याने सुरक्षेसाठी शहापूर टाऊन बंद ठेवण्यात आला आहे.
12:45 नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या शहर व ग्रामीण भागातील शाळांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
12:42 रायगडमध्ये राजधानी एक्स्प्रेस अडकली आहे
12.46 नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून आज सकाळी आठ वाजता खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे
गेल्या २४ तासांमध्ये त्रंबकेश्वर, आंबोली या परिसरात २०० ते ३०० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाल्यामुळे गंगापूर, कश्यपी, गौतमी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणामधून होणारा पाण्याचा विसर्ग ठराविक अंतराने वाढवला जाणार आहे. याचा परिणाम म्हणजे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
12.52 मुंबई - आरे कॉलनी रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे पवई तलाव परिसरात पाणीच-पाणी साचले आहे. शिवाय विहार तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे मिठी नदीचे पाणी पवई-आरे कॉलनी रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ज्यांना पवईला यायचे आहे त्यांनी आरे रोडचा वापर न करता पवई गार्डन रस्त्याचा वापर करावा तर ज्यांना पाश्चिम द्रुतगती मार्गाने यायचे असेल त्यांनीही आरे रोडचा वापर न करता महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
11.52 बीड - आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद मेळाव्यापूर्वी गेवराईत कोसळला सभा मंडप
11.47 रायगड - अलिबाग शहर जलमय.. पहिल्यांदाच शहराला बसला पुराचा फटका
जखमींची नावे -
मोहम्मद शेख (वय15), झुबेदा शेख (वय 70), अहमद शेख (वय14) अब्दुल शेख (वय 42) ... सर्वांची प्रकृती स्थिर
11.20 नाशिक - जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम.... कसारा ते कल्याण रेल्वे ट्रक वर पाणी साचले... नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द ... सेवाग्राम एक्सप्रेस, राजराणी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस रद्द... इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे पाच वाजल्यापासून दुरांतो एक्सप्रेस उभी..चाकरमान्यांचे हाल..
11.07 रत्नागिरी - जिल्ह्यात मुसळधार बरसात सुरूच... 24 तासात 153 मिमी पावसाची नोंद...दापोली तालुक्यात सर्वाधिक 225 मिमी पाऊस
11.05 - गुजरात - मुसळधार पावसामुळे बरूच जिल्ह्यातील नांदिडा गावात भिंत कोसळली. भिंतीखाली दबून ३ मुलांचा मृत्यू
11.01 मध्यप्रदेश - बारवानीच्या निवळी भागात बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर १० जण जखमी, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
10.55 नाशिक - धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता, नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी..
-
#WATCH: Flooding in premises of Trimbakeshwar Temple in Nashik following incessant rainfall. #Maharashtra pic.twitter.com/e2RVbAOeFx
— ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH: Flooding in premises of Trimbakeshwar Temple in Nashik following incessant rainfall. #Maharashtra pic.twitter.com/e2RVbAOeFx
— ANI (@ANI) August 4, 2019#WATCH: Flooding in premises of Trimbakeshwar Temple in Nashik following incessant rainfall. #Maharashtra pic.twitter.com/e2RVbAOeFx
— ANI (@ANI) August 4, 2019
10.40 ठाणे - बारवी धरण ओव्हरफ्लो, बारवी, उल्हासनगर नदी व खाडी काठच्या नागरिकांच्या घरात शिरले पुराचे पाणी, सकाळी पाच वाजल्यापासून समुद्राला भरती आल्याने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा, भिवंडी, अंबरनाथ शहरात सकल भागात चोहीकडे पाणीच-पाणी साचले आहे... रात्रीपासून संततधार पाऊस सुरूच
10.29 - कल्याण - अंबरनाथ मार्ग बंद, तर कल्याण-नगर मार्गावरील चोहीकडे पाणीच पाणी, कल्याण-नगर महामार्गावरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प
10.20 नंदुरबार - जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला नदी-नाल्यांना पूर... धरणे ओवरफ्लो... अधिक वाचा
10.18 मुंबई - काल सकाळी 8 ते आज सकाळी 8 पर्यंत गेल्या 24 तासात मुंबई शहरात 146 मिलिमीटर, पूर्व उनगरात 195 मिलिमीटर, पश्चिम उनगरात 195 मिलिमीटर पावसाची नोंद... मुसळधार पावसामुळे सायन परिसरात झाडे पडली; कोणतीही जीवितहानी नाही... जोरदार पावसामुळे मुंबईतील काही मार्गांवरील वाहतूक वाहतूक वळवली
10.15 गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा नक्षलग्रस्त अर्जुनी-मोरगाव भागाकडे रवाना, सुरक्षा व्यवस्था दुप्पट वाढवली..
10.01 पुणे - खडकवासला धरणक्षेत्रातील पाणीसाठा 98 टक्के वर पोहचला... धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने मुठा नदीत 11 वाजता 35 हजार 574 क्युसेक पाणी सोडण्यात येणार... कालपासून शहरातील डेक्कन भिडे पूल पाण्याखाली.... नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.... शहर व परिसरात संततधार पाऊस सुरू. अधिक वाचा
9.45 रायगड - मुरुड तालुक्यातील साळव येथील डोंगराचा काही भाग कोसळून रस्त्यावर आला आहे... मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू... सुदैवाने जीवितहानी नाही.
9.40 ठाणे - सतत तिसऱ्या दिवशीदेखील ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, आज पुन्हा ठाण्यातील सखोल भागात साचले पाणी.. रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर परिणाम... मध्यरेल्वे अर्धातास उशिरा... रविवार असल्याने चाकरमान्यांची ठाणे रेल्वे स्थानकात गर्दी कमी, मात्र कामानिमित्त बाहेर निघालेल्यांचे हाल...
सकाळी 9.35 - कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; पंचगंगा, कृष्णा, वारणा नदीची पूरस्थिती गंभीर सविस्तर वृत्त
सकाळी 8:23 ठाणे - डोंबिवली शहरातील मिलापनगर एमआयडीसी परिसरातील तसेच कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणि कल्याण खाडी लगतच्या घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले असून बहुतांश परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे, तर नागरिक सुरक्षित ठिकाणी दुसरीकडे घर सोडून जात आहेत. शहरात अनेक ठिकाणी झाडे उमळून पडली आहेत. तर काही सोसायट्यांचा इलेक्ट्रिक मीटर बॉक्स पर्यंत पाणी आले आहे. असाच पाऊस पडत राहिला तर परिस्थिती आणखीच बिकट होण्याच्या मार्गावर आहे,
सकाळी 8:33 सांगली - सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी - आयर्विन पुलाजवळ 40 फुटावर पाणी पातळी पोहोचली सविस्तर वृत्त
सांगलीत पुराचा धोका वाढला -
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम - धरणातून पाण्याच्या वाढवण्यात आला विसर्ग - 20 हजार 412 क्यूसेक्स पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरू - वारणा नदीच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ दोन्ही नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
सकाळी 8.22 - सलग दुसऱ्या दिवशी मुंबई उपनगरांसह ठाणे, कल्याण, वसई-विरार परिसरात पाऊस सुरुच
शनिवारी रात्रीपासून पडत आहे पाऊस मध्य रेल्वे कोडमली
मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहील; वेधशाळेचा अंदाज
नाशिक - नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम..रात्रभर संततधार पाऊस..धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला..
खालील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू...
गंगापूर धरणातून 20040 क्यूसेस,
दारणा धरणातून 26150 क्यूसेस
नांदूरमध्यमेश्वर धरणं 83773 क्यूसेस
भावली धरणं 1509 क्यूसेस
आळंदी धरणं 2717 क्यूसेस
पालखेड धरणं 6068 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू..
रत्नागिरी - रत्नागिरीतल्या चांदेराई बाजारपेठेला पुराचा वेढा
08.09 - ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे बारवी धरण आज पहाटे 4.30 वा ओव्हरफ्लो ,धरणात दुप्पट पाणीसाठा
सकाळी 8.00 - मध्य रेल्वे : सायन आणि कुर्ला रेल्वे स्थानकातील चारही लाईनवर पाणी साचल्याने सकाळी ७.२० वाजल्यापासून सेवा ठप्प
-
Mumbai: Streets waterlogged following heavy rain in the city; #visuals from Sion. #Maharashtra pic.twitter.com/3lVp8Ahv70
— ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: Streets waterlogged following heavy rain in the city; #visuals from Sion. #Maharashtra pic.twitter.com/3lVp8Ahv70
— ANI (@ANI) August 4, 2019Mumbai: Streets waterlogged following heavy rain in the city; #visuals from Sion. #Maharashtra pic.twitter.com/3lVp8Ahv70
— ANI (@ANI) August 4, 2019
सकाळी 7.42 - सायन, सांताक्रुझ भागात जोरदार पावसामुळे पाणी रस्त्यावर पाणी साचले.
सकाळी 7.40 - मुसळधार पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकावर पाणीच-पाणी, रेल्वेरुळ गेले पाण्याखाली अधिक वाचा
सकाळी 7.30 - मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम
-
Maharashtra: Kalyan railway station waterlogged following incessant rain in the city. pic.twitter.com/JY0w44Ygy8
— ANI (@ANI) August 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra: Kalyan railway station waterlogged following incessant rain in the city. pic.twitter.com/JY0w44Ygy8
— ANI (@ANI) August 4, 2019Maharashtra: Kalyan railway station waterlogged following incessant rain in the city. pic.twitter.com/JY0w44Ygy8
— ANI (@ANI) August 4, 2019