मुंबई - आरेतील एकही झाड शिवसेना कापू देणार नाही, असा पवित्रा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. आरेतील मेट्रो कारशेडसाठी पालिकेने झाड तोडण्यास अंतरिम परवानगी दिल्यावर आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा - आरेमधील झाडे तोडण्यास मुंबई महापालिकेची मंजुरी; 2700 झाडांची होणार कत्तल
आमचा विरोध काही उगाचचा नाही. मुख्यता जे कुणी आरेच्या मागे लागलेत त्यांना जमीन मेट्रोच्या घशात घालायची आहे. मुंबईत तीन हजार झाडे आधीही कापली गेली आहेत याची नोंद आमच्याकडे आहे. त्याचे पुनर्रोपण किती झाले त्याचीही तपासणी व्हायला पाहिजे, अशी मागणी आदित्य यांनी केली.
वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली असली तरी त्या प्राधिकरणातील जे तज्ञ आहेत त्यांना फसवून ही मंजूरी दिली गेली असल्याचे आदित्य म्हणत होते. त्यामुळे यामध्ये न्यायालयाने दखल घ्यावी मागणी त्यांनी केली आहे. यामधील तज्ञ जर म्हणत असतील की त्यांची फसवणुक केलीय. तर ती कोणी केलीय?. का एवढं जोर जबरदस्तीने केली याची चौकशी व्हावी असे देखील ते म्हणाले.
हेही वाचा - वित्त आयोगाबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारला दिला 'हा' सल्ला
आरेत 'जी इको सिस्टम' आहे ती आम्हाला दिसत असेल तर आरेच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांच्याकडून काम नीट होत नसेल तर दुसरे सक्षम अधिकारी आणले पाहिजेत असे देखील आदित्य म्हणाले.