ETV Bharat / state

Painter: कधीकाळी दुसऱ्याचे चित्र पाहण्यासाठी धडपणारा तरुण बनला चित्रकार; पाहा खास स्टोरी - चित्र पाहण्यासाठी धडपणारा तुरुण बनला चित्रकार

असे म्हटले जाते की मुंबई ही प्रत्येकाला आपलेसे करून घेते. प्रत्येकाला त्याची ओळख देते. मात्र, त्यासाठी मुंबईत खडतर परिश्रम आणि संयम या दोन्ही गोष्टी असाव्या लागतात. अशी अनेक नावाजलेली उदाहरणे आज देता येतील. नोकरीच्या शोधात आलेला अशाच एका तरुणाने मुंबईमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मुंबईमधील खडतर प्रवासानंतर आज एक चित्रकार म्हणून तो नावारूपाला आला आहे.

Painter
चित्रकार एम इम्तियाज चिंत्र रंगवताना
author img

By

Published : Dec 15, 2022, 8:17 PM IST

Updated : Dec 16, 2022, 7:52 AM IST

चित्रकार एम इम्तियाज ईटीव्ही भारतशी बोलताना

मुंबई - एका आज मुंबईत चित्रकार म्हणून आपला एक ठसा उमटवला आहे. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे फोर्ट या परिसरामध्ये फुटपाथवर सध्या तो आपले पेंटिंग तयार करतो. आणि तेथेच विकतो. या तरुणाचे नाव इम्तियाज असे आहे. तो बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यातून आला आहे. या तरुणाने (2010) पासून मुंबईतील फोर्ट काळा घोडा या परिसरात चित्र काढायला सुरुवात केली. कोणताही चित्रकार पेंटिंग काढण्यासाठी ब्रशचा शंभर टक्के वापर करत असतो. मात्र, इम्तियाजने आपली चित्र काढण्याची पद्धत अत्यंत वेगळी ठेवली आहे.

पेंटिंग काढणाऱ्या चित्रकारांची चित्रे पाहायचो - चित्र काढताना कमीत-कमी ब्रशचा वापर तो करतो. जगभरात अशा प्रकारची पेंटिंग्स करणारे मोजके चित्रकार आहेत. चित्र काढण्याच्या या पद्धतीला "क्यू विजम पेंटिंग" असे म्हणतात. विदेशात या प्रकारच्या पेंटिंग्सला खूप महत्त्व असते. तसेच, या पेंटिंग्सला भरघोस किंमतही मिळते. त्यामुळे मुंबईत फिरायला येणारे परदेशी पर्यटक इम्तियाज यांचे पेंटिंग्स अत्यंत आवडीने पाहतात. तसेच, त्यांचे पेंटिंग खरेदी करणाऱ्यांमध्ये विदेशी पर्यटक जास्त आहेत असे इम्तियाज हे सांगत आहेत. तसेच, मॉडेन आर्ट मध्ये "क्यू विजम पेंटिंग" येते. पेंटिंगची आपल्याला आधीपासूनच आवड असल्याने मुंबईत आल्यानंतर आपण रस्त्यावर किंवा इतरत्र पेंटिंग काढणाऱ्या चित्रकारांची चित्रे पाहायचो. त्यांच्याशी याबाबत चर्चा करायचो. मात्र, अनेक जण सामान्यतः ब्रशच्या साह्याने चित्र काढायची. "क्यू विजन पेंटिंग" याबाबत आपल्याला थोडाफार ज्ञान होते. आणि इतर चित्रकारांशी त्याबाबत माहिती घेऊन आपण मुंबईत रस्त्यावर "क्यू विजम पेंटिंग"ला इम्तियाज ने सुरुवात केली.

s
s

मुंबईतील खडतर प्रवास - इम्तियाज (2007)साली मुंबई आला. मात्र, बिहार ते मुंबईचा त्याचा प्रवास हा अत्यंत खडतर असा राहिला आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात इम्तियाज आपल्या चार भावंडांसोबत राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडील मोलमजुरी करत होते. त्यामुळे मुंबईतील आपण काहीतरी करू, चांगली नोकरी मिळवू अशी आशा इम्तियाजला होती. लहानपणापासूनच तो चित्रकलेत पारंगत होता. त्यांच्या गावात राहणारे एक शेजारी मुंबईत राहत होते. ते देखील चित्रकार होते. त्यामुळे सातत्याने आपल्याला मुंबईत त्यांनी न्यावे आणि तिथे एखादे काम द्यावे. यासाठी तो प्रयत्न करत होता. (2007)साली त्या व्यक्तीने इम्तियाज मुंबईत आणले. आपल्याला काम मिळावे यासाठी इम्तियाजने मुंबईत धूळ छानली. मात्र, इम्तियाला काही काम मिळाले नाही. पण या सोबतच त्याने आपल्या सहकाऱ्याजवळ पेंटिंगचे काम करायला सुरुवात केली होती. मात्र, या कामातून त्याला कोणताही मोबदला मिळत नव्हता. दोन वर्ष बिन मोबदला घेता इम्तियाजने त्यांच्याकडे काम केले. मात्र, त्यानंतर स्वतः मुंबईच्या रस्त्यावर पेंटिंग करण्याचा निर्णय 2010 साली घेतला.

मुंबईने दिली ओळख - इम्तियाजने (2010)पासून मुंबईच्या फुटपाथवर आपले स्वतःचे पेंटिंग करायला सुरुवात केली. इतर चित्रकारांपासून काही हटके आपण तयार केले पाहिजे. या संकल्पनेतून "क्यू विजन पेंटिंग" बनवले. त्याला मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबईत आणि महाराष्ट्रात नावाजलेला असे काळा घोडा फेस्टिवल येथे इम्तियाज आपल्या चित्रांचा दरवर्षी प्रदर्शन भरवतो. यासोबतच बंगलोरमध्ये होणाऱ्या पेंटिंग फेस्टिवलला देखील त्याला आमंत्रित करण्यात येते. आज इम्तियाज आपले पेंटिंगची किंमत तीन हजारांपासून २५ हजारापर्यंत आहे. मात्र, असे असलं तरी कोणत्याही मोठ्या एक्जीबिशन हॉलमध्ये आपली पेंटिंग लागण्यापेक्षा मुंबईच्या फुटपाथवर त्याला प्रत्येक नागरिक आणि पर्यटक पाहतो, दात देतो हे इतिहासला आपल्या केलेल्या कामाचे चीज वाटते. आपले काम हे प्रत्येक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचते त्याला दाद मिळते याचा त्याला अभिमान असल्याचे तो अभिमानाने सांगतो.

Last Updated : Dec 16, 2022, 7:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.