मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणार एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.
२०१९-२० या हंगामातील धान उत्पादकांसाठी केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र, धान उत्पादकाच्या खर्चात वाढ झाली आहे. त्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.