ETV Bharat / state

मुंबईत क्रेडिट कार्ड वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या - Recovery Agent Distress News Mumbai

वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल वैती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.

अमोल वैती
author img

By

Published : Nov 7, 2019, 7:12 PM IST

मुंबई - वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून शहरातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमोल वैती असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अमोलने विविध बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र व्यवसायात नुकसान झाल्याने तो वेळेत कर्ज फेडू शकला नाही.

माहिती देताना अमोल वैती यांचे भाऊ सिल्वेस्टर वैती

अमोल फ्रान्सिस वैती हा दहिसर परिसरातील खंदारपाडा येथे राहत होता. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मित्रांना, नातेवाईकांना व्हाट्सअ‌ॅपच्या माध्यमातून सुसाईड नोट लिहून पाठवली होती. त्यानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून विविध बँकांकडून, वसुली एजन्सींकडून कर्ज वसुलीसाठी अमोल यास फोन येत होते. अमोलचे त्याच्या व्यवसायामध्ये फार मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला होता.

आर्थिक संकटात सापडल्याने विविध बँकांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची त्याच्याकडून परतफेड झाली नाही. त्यामुळे त्याचे क्रेडिट कार्डच्या वसुली एजंटसोबत देखील भांडण होत होते. आपण क्रेडिट कार्डच्या वसुली एजंटला यासंदर्भात पूर्ण माहिती दिली होती. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हवा आहे, अशी विनंतीसुद्धा आपण वसुली एजंटच्या एजन्सीला केले असल्याचे अमोलने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर, बँकेच्या वसुली एजंटच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणीही अमोल वैती यांनी सुसाईड नोटमध्ये केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा- मी पुन्हा येईन...'गप्प बसा', शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी

Intro: क्रेडिट कार्डच्या माध्यमातून विविध बँकांकडून घेतलेले कर्ज परत करू न शकल्यामुळे क्रेडिट कार्ड रिकव्हरी एजंटच्या त्रासाला कंटाळलेल्या अमोल वैती याने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे.

मुंबईतील दहिसर परीसरातील खंदारपाडा येथे राहणाऱ्या अमोल फ्रांसिस वैती या युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मित्राना , नातेवाईक व्हाट्सअप च्या माध्यमातून सुसाईड नोट लिहून पाठवली होती. त्यानंतर त्याने राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे . गेल्या काही महिन्यांपासून विविध बॅंकांकडून रिकव्हरी एजन्सी कडून कर्ज वसुली साठी अमोल यास फोन येत होते . अमोल वैती यास त्याच्या व्यवसायामध्ये फार मोठे नुकसान झाले होते. ज्यामुळे तो गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात सापडला होता . या दरम्यान विविध बँकांच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्यामुळे अमोल वैती याचे क्रेडिट कार्डच्या रिकव्हरी एजंट सोबत भांडण होत होते. आपण क्रेडिट कार्डच्या रिकव्हरी एजंटला यासंदर्भात पूर्ण माहिती दिली होती. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी आपल्याला थोडा वेळ हवा अशी विनंती सुद्धा आपण रिकव्हरी एजंटच्या एजन्सीला केल्याचं त्याने त्याच्या सुसाईड नोट मध्ये लिहिलेल आहे. यानंतर पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा नोंदवून बँकेच्या रिकव्हरी एजंटच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी अमोल वैती यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या सुसाईड नोटमध्ये केली आहे

Body:( मृताच्या नातेवाईकांचा बाईट जोडला आहे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.