मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. गोळीबाराची ही घटना आज (२८ मे) सकाळी ७.५७ वाजता घडली. या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मात्र हा गोळीबार नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गोळीबार करून आरोपी फरार झाला.
परिसरात भीतीचे वातावरण : गोळीबाराची माहिती मिळताच कांदिवली पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात गेल्या सहा ते सात महिन्यांत गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती. मृत तरुण हा परिसरात टँकरने पाणी विकत होता. या व्यवसायातील वर्चस्वाच्या वादातून त्यांची हत्या झाल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी कांदिवली पोलीस तपास करत आहेत.
गेल्या वर्षी घडली होती गोळीबाराची घटना : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कांदिवली पश्चिम येथील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. मध्यरात्री या भागात अचानक गोळीबार झाला होता. तब्बल चार राऊंड फायर करण्यात आले होते. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्यांच्यात झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या गुजरातमधील दोघांना अटक केली.
अंधेरीत गोळीबार करून हॉटेल मालकाचे अपहरण : अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिन्याभरापूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. मुंबईतील अंधेरी कुर्ला रोडवरील हॉटेल विरा रेसिडेन्सीच्या मालकावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. अतिशय सिनेमॅटिक शैलीत गोळीबारानंतर बंदूकधाऱ्यांनी जखमी हॉटेल मालकाचे इनोव्हा कारमधून अपहरण केले होते. सध्या एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी 10 ते 12 वेगवेगळी पथके तयार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक करून हॉटेल मालकाची सुखरूप सुटका केली होती.
गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद : सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मनोज चौहान यांच्यावर पिस्तुल दाखवून त्याच्यावर उघडपणे गोळीबार करत असल्याचे दिसत आहे. घटनेनंतर सध्या आरोपी गटना घटनास्थळावरून फरार झाला आहे. उत्तर विभागातील संपूर्ण तपास पथकामध्ये आरोपींना पकडण्यासाठी 6 पथके तैनात करण्यात आली आहेत. गटनास्थळी अतिरिक्त आयुक्त राजीव जैन अँड डीसीपी अजय कुमार बन्सल यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, आरोपींना लवकरच अटक केली जाईल, अजून तपास सुरू आहे.