मुंबई - इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर कोरोनावर मात करता येऊ शकते, हे तब्बल 97 वर्षाच्या आज्जीने दाखवून दिले. त्या उपचारानंतर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.
या आज्जी घरीच राहत होत्या. त्यांच्या घरातील सात लोकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. आज्जी यांना क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांना लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आठ दिवसांपूर्वी त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्या घाबरल्या नाहीत. त्यांना मुंबईच्या प्रिन्स अली खान रुग्णालयात दाखल केले होते. तसेच वय जास्त असल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास अडचणी येत होत्या. त्यांना वयोमानानुसार कमी ऐकायला येते. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना त्यांच्याशी इशाऱ्यातून बोलावे लागत होते. अशातही त्यांची जगण्याची जिद्द कायम होती. त्यामुळे त्यांनी कोरोनावर मात केली आणि अगदी ठणठणीत बऱ्या होऊन त्या घरी परतल्या आहे. आपण कोरोनाला हरवू शकतो, असा संदेश त्यांना दिला आहे.