मुंबई - आज (दि. 19 नोव्हेंबर) मुंबईत नव्या 924 रुग्णांची नोंद झाली असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 310 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
8 हजार 474 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज (गुरूवारी) कोरोनाचे 924 नवे रुग्ण आढळून आले असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 10 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 10 पुरुष तर 2 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 72 हजार 449 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 624 वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 192 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 49 हजार 903 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 474 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 310 दिवसांवर
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 310, दिवस तर सरासरी दर 0.22 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 439 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 491 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 22 हजार 605 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या
7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण