मुंबई - पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस याच्या नावावर आलेले मुंबई- ठाणे येथील 4 फ्लॅट जप्त करण्यात आले असून पुण्यात दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल 9 फ्लॅट असल्याची माहिती न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. पीएमसी बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सोमवारी न्यायालयात राकेश वाधवा, सारंग वाधवा आणि वारीयम सिंग यांना हजर करण्यात आले. न्यालायलाने तीनही आरोपींच्या पोलीस कोठडीत 16 ओक्टॉबर पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : 'नो बेल ओनली जेल', आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार
काही वर्षांपूर्वी थॉमसने बँकेतील खासगी सचिव म्हणून काम करणाऱ्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी धर्मांतर केले असून, धर्मांतर केल्यानंतर त्याने त्याचे नाव जुनेद ठेवले होते. पुण्यातील संपत्ती ही त्याने त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर घेतली असून यांची किंमत 4 कोटीहून अधिक असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात म्हटले आहे. बँकेच्या एमडी पदावर असताना करोडो रुपयांची संपत्ती थॉमसने कशी मिळविली याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेला करण्यास वेळ हवा म्हणून आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली.
हेही वाचा - वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय