मुंबई - राज्यात ( Corona Update ) गुरुवारी (दि. 9) दिवसभरात 789 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 585 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर 97.72 टक्के इतका असून मृत्यूदर 2.17 टक्के इतका आहे.
6 हजार 286 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 789 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 41 हजार 677 वर पोहोचला आहे. तर, आज 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 41 हजार 211 वर पोहोचला आहे. आज 585 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 90 हजार 305 वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के, तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 65 लाख 17 हजार 323 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.98 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 74 हजार 353 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 6 हजार 482 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 219
ठाणे पालिका - 10
नवी मुंबई पालिका - 37
कल्याण डोबिवली पालिका - 11
वसई विरार पालिका - 16
नाशिक पालिका - 19
अहमदनगर - 53
अहमदनगर पालिका - 10
पुणे - 54
पुणे पालिका - 74
पिंपरी चिंचवड पालिका - 54
16 प्रवाशांची जनुकीय चाचणी
राज्यात ओमायक्रॉनचे (Omicron Variant ) 10 रुग्ण आढळून आले होते. पैकी एक कोरोनामुक्त झाल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 52 हजार 904 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 9 हजार 945 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 13 आणि इतर देशातील 3 अशा एकूण 16 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवण्यात आल्याचे राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हे ही वाचा - Mumbai Corona Upadate : मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढली, सलग दुसऱ्या दिवशी 200 पेक्षा जास्त रुग्ण