ETV Bharat / state

लॉकडाऊन काळात 7576 आरोपींवर गुन्हे दाखल - mumbai lockdown

20 मार्च ते 17 एप्रिल यादरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात 3832 प्रकरणात तब्बल 7576 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1101 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 1616 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे.

लॉकडाऊन काळात 7576 आरोपींवर गुन्हे दाखल
author img

By

Published : Apr 17, 2020, 8:20 PM IST

मुंबई - कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाययोजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. राज्यात लॉकडाऊनचा काळ 3 मेपर्यंत वाढवला गेला असून पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला आहे.

20 मार्च ते 17 एप्रिल यादरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संदर्भात 3832 प्रकरणात तब्बल 7576 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1101 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 1616 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे , तर 4859 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.

गेल्या 24 तासांत मुंबई शहरात कलम 188 नुसार पोलिसांनी तब्बल 228 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

दक्षिण मुंबईत एकूण 20 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून मध्य मुंबई 89, पूर्व मुंबईत 28 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. पश्चिम मुंबई 65 व उत्तर मुंबई 26 अशी कारवाई मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.