ETV Bharat / state

रुग्णालयातून थेट मतदारकेंद्रात जाऊन आजारी ७५ वर्षीय ज्योत्स्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय ज्योत्स्ना शहा यांनी मतदान करण्याचा हट्ट धरत डॉक्टरांच्या परवानगीने थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप येथील मतदान केंद्र गाठले.

ज्योत्स्ना शहा
author img

By

Published : Apr 29, 2019, 10:36 PM IST

Updated : Apr 29, 2019, 11:59 PM IST

मुंबई - आज मुंबईत लोकसभेचे चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. यावेळी युवकांमध्ये निरुत्साह तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. याचा प्रत्यय आज भांडुपमध्ये आला. आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७५ वर्षीय ज्योत्स्ना शहा यांनी मतदान करण्याचा हट्ट धरत डॉक्टरांच्या परवानगीने थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप येथील मतदान केंद्र गाठले.

रुग्णालयातून थेट मतदारकेंद्रात जाऊन आजारी ७५ वर्षीय ज्योत्स्ना यांनी बजावला मतदानाचा हक्क

मतदानाचा हक्क हा महत्वाचा आहे. एका मताने खूप फरक पडतो. यामुळे मी ठरवले की मतदान हे कोणत्याही परिस्थितीत करायचेच. त्यानुसार डॉक्टरांची परवानगी घेऊन मी मतदान केले. आतापर्यत मी एकही मतदान चुकवले नव्हते मग यावेळी तरी कसे चुकवू, असे शहा यांनी सांगितले.

माझी आई आजारपणामुळे ७ दिवसांपासून रुग्णालयात आहे. परंतु, तिने माझ्याकडे यंदा मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी डॉक्टरांच्या परवानगीने तिला मतदान केंद्रापर्यत नेले, असे शहा यांच्या मुलाने सांगितले.

Intro:मुंबई ।

आज मुंबईत लोकसभेचे चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले. युवकांमध्ये निरुत्साह तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. त्याचाच प्रत्यय आज भांडुप मध्ये आला. आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 75 वर्षीय ज्योत्स्ना शाह (७६) यांनी मतदान करण्याचे हट्ट धरत डॉक्टरच्या परवानगीने थेट मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भांडुप येथील मतदान केंद्रात दाखल झाल्या.
Body:मतदानाचा हक्क हा किती महत्वाचा आहे. एक मताने खूप फरक पडतो. यामुळे मी ठरवलं की मतदान हे कोणत्याही परिस्थितीत करायचे. त्यानुसार डॉक्टरांची परवानगी घेऊन मी मतदान केले. मी आतापर्यत एकही मतदान चुकवले नव्हते मग यावेळी कसे मतदान चुकवू असे, शहा यांनी सांगीतले.

माझी आई आजारपणामुळे ७ दिवसापासून रुग्णालयात दाखल आहे. परंतु, तिने माझ्याकडे यंदा मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मी डॉक्टरच्या परवानग़ीने तिला मतदान केंद्रापर्यत नेले, असे शहा यांच्या मुलाने सांगितले .Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 11:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.