ETV Bharat / state

Mumbai crime : एटीएसने ६४ कोटीच्या अंमली पदार्थांची केली राख, अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा - ATS In Mumbai

राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडून ६४ कोटी ३६ लाख रूपयांच्या अंमली पदार्थाचा नाश करण्यात आला आहे. आज केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ड्रग ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी या विषयावर दिल्लीमध्ये परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान अमित शहा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुद्देमालाचा आढावा घेतला.

Mumbai crime
अंमली पदार्थ नाश
author img

By

Published : Jul 17, 2023, 9:19 PM IST

Updated : Jul 17, 2023, 11:00 PM IST

मुंबई : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या व्हर्च्यूअल उपस्थितीत 'Drug Trafficking and National Security' या विषयावर दिल्ली येथे आज महत्वाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या आयोजनादरम्यान केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाश करण्यात येणाऱ्या मुद्देमालाचा आढावा घेतला. त्यावेळी दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ४ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण १६१ किलो वजनाचा, अंदाजे किंमत ६४ करोड ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या ठिकाणी बंदीस्त भट्टीमध्ये जाळून नष्ट करण्यात आला.

ड्रग्सची लावली विल्हेवाट : फेब्रुवारी महिन्यात मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने वसईत मोठी कारवाई केली होती. वसईच्या पेल्हार गावातून १७२४ ग्रॅम हेरॉईन नावाचे ड्रग्स (अमली पदार्थ) जप्त केले होते. जप्त करण्यात आलेल्या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारात ५ कोटी इतकी किंमत आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ६० हजार रोख रक्कमही जप्त केली होती. एटीएसनेही अलीकडेच कारवाई केलेली आहे. अशाप्रकारे चार गुन्ह्यांमध्ये एटीएसने जप्त केलेल्या ड्रग्सची विल्हेवाट आज लावण्यात आली आहे.

५००० कोटी किंमतीचा मुद्देमाल - सन २०२३ मध्ये मागील ३ महिन्यामध्ये बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे एकूण ४००० किलो इतक्या वजनाचा व ५००० कोटी किंमतीचा मुद्देमाल यशस्वीरित्या नाश केला आहे. अशा प्रकारे बृहन्मुंबई पोलीस दल हे अंमली पदार्थ मुक्त समाजनिर्मितीसाठी सतत प्रयत्नशील आहे.

यांनी केली कारवाई : ही कारवाई राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली, दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी दहशतवाद विरोधी पथकाच्या अंमली पदार्थ नाश समितीच्या अध्यक्षा शीला साईल, पोलीस अधीक्षक (गुप्तवार्ता) व अंमली पदार्थ नाश समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Mumbai Crime News : डार्कनेटच्या सहाय्याने ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड, एक कोटींच्या ड्रग्स जप्तीसह एका नायजेरियन व्यक्तीस अटक
  2. Drug Destroyed In Mumbai: सीमाशुल्क विभागाने 1500 कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट
  3. Pune Crime News: पुण्यात 10 लाख रुपये किंमतीचे 'म्याव म्याव' ड्रग्स जप्त

Last Updated : Jul 17, 2023, 11:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.