मुंबई - मुंबईत सकाळी जमावबंदी, रात्री नाईट कर्फ्यू, तर शुक्रवार ते सोमवार वीकेंड लॉकडाऊनचा परिणाम म्हणून काही प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज 6 हजार 905 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षा वेळेवरच होणार - अमित देशमुख
90 हजार 260 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज 6 हजार 905 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 27 हजार 119 वर पोहचला आहे. आज 43 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, मृतांचा आकडा 12 हजार 60 वर पोहचला आहे. 9 हजार 37 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 23 हजार 687 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 90 हजार 267 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 36 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 85 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 919 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 46 लाख 50 हजार 187 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा