ETV Bharat / state

आज...आत्ता...रात्री 12 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

घातपाताचा प्रयत्न नाही.., शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीन कांड्या ठेवणाऱ्या संशयितास अटक. उरणच्या खोपटा पुलाखाली दहशतवादाशी संबंधित मजकूर लिहणारा पोलिसांच्या ताब्यात. धोनीच्या ग्लोव्हजवरील सेनेचे चिन्ह हटवा; आयसीसीची बीसीसीआयला विनंती. उष्णतेचा कहर..! नागपुरात एकाच आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी. यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून शेतकरी दाम्पत्य ठार, गावावर शोककळा.

आज...आत्ता...रात्री 12 पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : Jun 6, 2019, 11:56 PM IST

घातपाताचा प्रयत्न नाही.., शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीन कांड्या ठेवणाऱ्या संशयितास अटक

मुंबई - लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शालिमार एक्स्प्रेसमध्ये काल (बुधवार) दुपारी जिलेटीनच्या ५ कांड्या आणि बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमागे शहरात काही घातपात घडविण्याचा कट आहे का? याचा पोलीस शोध घेत होते. मात्र, तसे काहीही नसून पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस अटक करण्याच्या उद्देशाने हा कट आखला होता. पोलीस तपासात हा प्रकार निष्पन्न झाला आहे. पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलीसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची त्यांनी माहिती दिली. वाचा सविस्तर

उरणच्या खोपटा पुलाखाली दहशतवादाशी संबंधित मजकूर लिहणारा पोलिसांच्या ताब्यात

रायगड - जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये दहशतवादाशी संबंधित मजकूर लिहिणारा ७२ तासात पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. अमीर उल्लाह अजिउल्लाह शेख (३३) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. आज ६ जून रोजी उरण न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. त्याच्यावर १५३ अ/ब तसेच सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून १२ जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. वाचा सविस्तर

धोनीच्या ग्लोव्हजवरील सेनेचे चिन्ह हटवा; आयसीसीची बीसीसीआयला विनंती

नवी दिल्ली - आयसीसी विश्वकरंडकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात काल (बुधवार) सामना झाला. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीने ग्लोव्हजवर पॅरा स्पेशल फोर्सच्या चिन्हाचा वापर केला होता. वाचा सविस्तर

उष्णतेचा कहर..! नागपुरात एकाच आठवड्यात उष्माघाताचे तब्बल ४५ बळी

नागपूर - नागपुरातील उष्णतेच्या लाटेत एका आठवड्यात ४५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येथील पोलीस विभागामध्ये दररोज ५-६ जणांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद होत आहे. यामध्ये फुटपाथवर वास्तव्यास राहणाऱ्यांची संख्या आहे. तर विशेष म्हणजे बुधवारी एका दिवसात ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. वाचा सविस्तर

यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून शेतकरी दाम्पत्य ठार, गावावर शोककळा
यवतमाळ - वीज अंगावर पडून शेतकरी पती -पत्नी ठार झाल्याची घटना जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गणेशवाडी येथे घडली. वासुदेव टेकाम आणि गंगाबाई टेकाम अशी मृतक पती-पत्नी यांची नावे आहेत. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.