ETV Bharat / state

गंभीर!  मुंबईत आढळले 52 नवे कोरोनाग्रस्त, एकूण रुग्णांची संख्या ३३० वर - mumbai news

मगील 24 तासात मुंबईत कोरोनाचे नव्याने 52 रुग्ण वाढले असून मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकुण संख्या 330 झाली आहे. कांदिवली येथील मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील 40 कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 4, 2020, 8:32 PM IST

Updated : Apr 4, 2020, 9:08 PM IST

मुंबई - मागील 24 तासात मुंबईत कोरोनाचे नव्याने 52 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 330 झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 22 झाली आहे. दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शताब्दी रुग्णालयातील 40 कर्मचाऱ्यांची टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली आहे.

मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 27 ते 31 मार्च दरम्यान खासगी लॅबमध्ये करण्यात आलेल्या चाचण्यापैकी 14 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये नव्याने 52 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमधील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा 330 झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाल्याचे पालिकेने म्हटले आहे. त्यात 3 जणांना दिर्घकालीन आजार होता. तर एक जण वयोवृद्ध होता. 4 जणांचा मृत्यू झाल्याने मुंबईमधील मृतांची संख्या 22 झाली आहे.

आतापर्यंत पालिका आणि खासगी लॅबमध्ये कोरोनासंदर्भात 10 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून 9 लाख लोकांचे सर्वेक्षण व तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

शताब्दीमधील 40 कर्मचारी निगेटिव्ह

कांदिवली येथील मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील 40 कर्मचारी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यांना त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्यावे, म्हणून आंदोलनही करण्यात आले होते.

Last Updated : Apr 4, 2020, 9:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.