ETV Bharat / state

लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये जिलेटीनसदृश्य कांड्या जप्त; भाजप सरकार विरोधात आढळली चिठ्ठी - जिलेटीन

आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गाडी लोकल यार्डात उभी करण्यात आली. त्यानंतर सफाई कर्मचारी गाडीची साफसफाई करीत असताना सीट क्रमांक ४० आणि ४१ या दोन्ही सीटच्या मध्ये जिलेटीन सदृश्य कांड्या, बॅटरी आणि त्याच्या बाजूला भाजप सरकारच्या विरोधात लिहिलेल्या मजुकराची चिठ्ठी आढळून आली.

फाईल फोटो
author img

By

Published : Jun 5, 2019, 1:00 PM IST

Updated : Jun 5, 2019, 4:06 PM IST

मुंबई - शालिमार एक्सप्रेसमधून जिलेटीनसदृश्य कांड्या जप्त करण्यात आल्या आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसवर गाडी उभी असताना लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली. यासोबतच भाजप सरकारच्या विरोधात लिहिलेल्या मजुकराची चिठ्ठी सापडली आहे.

आज सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास शालिमार एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवर आली. त्यानंतर ९ वाजण्याच्या सुमारास गाडी लोकल यार्डात उभी करण्यात आली. त्यानंतर सफाई कर्मचारी गाडीची साफसफाई करीत असताना सीट क्रमांक ४० आणि ४१ या दोन्ही सीटच्यामध्ये जिलेटीन सदृश्य कांड्या, बॅटरी आणि त्याच्या बाजूला भाजप सरकारच्या विरोधात लिहिलेल्या मजुकराची चिठ्ठी आढळून आली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि टिळक नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

बॉम्बविरोधी पथकालाही बोलावण्यात आले. त्यानंतर त्या जिलेटीन सदृश्य कांड्या नष्ट करण्यात आल्या. मात्र, त्यामध्ये फटाक्याची दारू असल्याचे आढळून आले. या ज्वलनशील पदार्थाच्या कांड्याना वायर जोडण्यात आली होती, या पदार्थांचा आगीशी संपर्क झाला असता तर स्फोट होण्याची शक्यता होती. मात्र, या वस्तूला डेटोनेटर जोडला नसल्याने त्याचा स्फोट झाला नाही असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यासोबतच भाजप सरकारच्या विरोधातील चिठ्ठी सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भातील अधिक तपास टिळक नगर पोलीस व राज्य एटीएसने तपास सुरू केला आहे. केंद्रातील भाजप सरकारला धडा शिकविण्यासाठी या ज्वलनशील कांड्या पाठविण्यात आल्याचे या चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे.

pieces of gelatine
भाजप सरकारच्या विरोधात लिहिलेली चिठ्ठी

काही दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील खोपटे खाडी पुलाखालील भिंतीवर आढळलेल्या दहशतवाद संदर्भातील मजकुरानंतर उरण तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या संदेशामध्ये कुर्ला टर्मिनसचा उल्लेख करण्यात आला होता. त्या अनुषंगाने लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला टर्मिनस) येथे सापडलेल्या जिलेटीन कांड्याचा काही संबंध आहे का? हे देखील तपासण्यात येत आहे. दरम्यान, शालिमार एक्सप्रेसमध्ये सापडलेले ज्वलनशील पदार्थ पुढील तपासासाठी फॉरेन्सिक लॅब ला पाठविण्यात आले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 5, 2019, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.