मुंबई - मुंबईत मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 429 नवे रुग्ण आढळून आले असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हेही वाचा - मुंबईतील नरीमन हाऊस व रेल्वेस्थानकांवर सुरक्षाव्यवस्थेत वाढ
कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 429 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 8 हजार 486 वर पोहचला आहे. आज 9 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 343 वर पोहचला आहे. 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 2 लाख 90 हजार 669 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 567 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 556 दिवस
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 556 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 201 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 2 हजार 188 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 27 लाख 89 हजार 713 चाचण्या करण्यात आल्या आहेत.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबर 2020 ला 576, 10 नोव्हेंबर 2020 ला 535, 16 नोव्हेंबर 2020 ला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, तर 26 जानेवारीला 342 म्हणजेच, सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - नवी मुंबई; वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त न्यायव्यवस्था सहभागी