मुंबई - शहरातील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विलेपार्ले उड्डाण पुलावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास भरधाव ट्रकने टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत.
ट्रकचालक भरधाव वेगाने ट्रक चालवत होता. त्यावेळी त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षाला जोरदार धडक दिली. मात्र, ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. या अपघातामध्ये ट्रक उड्डाणपुलाखाली पडल्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.