मुंबई - राज्यात आज कोरोनाचे 394 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 357 रुग्ण हे फक्त मुंबईतील आहेत. तर मुंबईत 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईतील 357 पैकी आज (शुक्रवारी) 189 रुग्ण आढळले, तर 20 आणि 21 एप्रिलला खासगी लॅबमध्ये टेस्ट केलेले 168 कोरोना बाधितांचा समावेश आहे. मुंबईत एकूण रुग्णांची संख्या ही 4589 वर पोहोचली आहे. तसेच 179 जणांचा मृत्यू झाला आहे.