मुंबई: राज्य शासनाने प्रत्येक महिन्याला लागणारी वेतनाची रक्कम ७ ते १० तारखेदरम्यान देण्याचे न्यायालयात संप काळात मान्य केले होते. मात्र अद्याप एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही. परिणामी, आता एसटी कर्मचारी आंदोलन करण्याच्या विचारात आहे, असा इशारा त्यांनी शासनाला दिला होता. मुंबई उच्च न्यायालयामध्ये एसटी कामगारांच्या संदर्भातील याचिका दाखल झाली होती. त्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत पगार दिला पाहिजे, असा आदेश दिला होता. मात्र एसटी महामंडळ आणि शासन वेळेवर पगार करू शकत नाही हे वास्तव आहे. परिणामी, एसटी कामगार आता आत्मदहनाच्या विचारापर्यंत येऊन ठेपले आहे. विलीनीकरण तर झाले नाहीच मात्र पगार सुद्धा वेळेत नाही, असे एसटी कामगारांचे म्हणणे आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची घालमेल सुरू: राज्याच्या अर्थ विभागाकडून केवळ 223 कोटी रुपये देण्याचा विचार सुरू आहे. विभागाची ३५० कोटी रुपये देण्याची मानसिकता दिसत नाही. काल वेगळी चर्चा झाली होती. त्यात पुन्हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण आज ही रक्कम मिळेल या आशेने एसटीचे अधिकारी मंत्रालयात बसून आहेत. ट्रेझरी विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना मंत्रालयात थांबायला सांगितले आहे. याचाच अर्थ आज वेतन मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, वेतन दिले जात नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची घालमेल सुरू आहे.
दोन खात्यात बेबनाव ? जानेवारी महिन्यात १९ तारीखला एसटी महामंडळाने मागील सहा महिन्यांच्या वेतन रकमेतील थकीत रकमेसह या महिन्याच्या वेतनासाठी १०१८. ५० कोटी रुपयांची मागणी लेखी पत्राद्वारे राज्य सरकारच्या अर्थ खात्याकडे केली होती. पण १३ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. आणखी काही दिवस वेतन लांबण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते आहे. या दोन खात्यातील बेबनावामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला विलंब होत असल्याची टीका महाराष्ट्र एस टी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
शासनाचे एसटीकडे दुर्लक्ष: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दरमहा दहा तारखेच्या आत पगार देणे सक्तीचे आहे. मात्र शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा निर्णयाचा अवमान करत आहे. त्यामुळे हे दर महिन्याला जीआर काढणे दर महिन्याला तारीख उलटून गेल्यानंतर पगार न होणे, हे थांबले पाहिजे. अन्यथा शासन एसटी आणि एसटी कर्मचाऱ्यांकडे बेफिकीर रीतीने पाहते, हा संदेश जनतेमध्ये जाणार असे देखील श्रीरंग बर्गे यांनी ई टीवी भारत सोबत संवाद साधताना म्हटले आहे.
हेही वाचा: Adani Group Share Price: अदानी समूहाला काहीसा दिलासा... शेअर्सच्या किमती वधारल्या