ETV Bharat / state

Look Back 2022 : जाणाऱ्या वर्षाने दिल्या काळजाला वेदना, 344 नागरिकांनी नैसर्गिक आपत्तीत गमावला जीव - नैसर्गिक आपत्तीने जनावरांचा मृत्यू 2022

Look Back 2022 : राज्यात 2022 मध्ये अनेक नैसर्गिक आपत्तीने ( Natural Disaster 2022 ) खळबळ उडवून दिली यात गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या महापुराने 84 नागरिकांचा बळी घेतला. या महापुरात ( Flood In Maharashtra 2022 ) अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक नागरिकांच्या घराची पडझड झाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. प्रशासनाने 35 ठिकाणी बचावासाठी छावण्या सुरू केल्या होत्या. राज्यात 2022 मध्ये नैसर्गिक आपत्ती ( 344 People Died In Maharashtra 2022 ) एकूण 344 नागरिकांचा बली गेला. तर 5968 नागरिकांना या आपत्तीतून बचावण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 19, 2022, 1:20 PM IST

Updated : Dec 22, 2022, 1:23 PM IST

मुंबई - Look Back 2022 : राज्यात 2022 हे वर्ष अनेक कारणांनी नागरिकांच्या लक्षात राहणारे. या वर्षात अनेक चांगल्या गोष्टी घडल्या असल्या तरी काही घटनांनी नागरिकांचे काळीज पिळवटून टाकले आहे. राज्यात पावसाळ्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीने 2022 ( Natural Disaster 2022 ) मध्ये 344 नागरिकांना ( 344 People Died In Maharashtra 2022 ) आपला जीव गमवावा लागला आहे. यात पूर ( Flood In Maharashtra 2022 ) , दरड कोसळून ( Land Slanding In Maharashtra 2022 ) झालेली जीवितहानी, वीज पडून ठार झालेले नागरिक, इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीत ठार झालेल्या नागरिकांची ही आकडेवारी आतापर्यंतची सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची आकडेवारी ठरली आहे. यापूर्वी 2018 मध्ये नैसर्गिक आपत्तीत सगळ्यात जास्त नागरिकांचा बळी गेला होता.

गडचिरोली महापुरात 84 नागरिकांचा गेला बळी गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा ( Naxal Affected District Maharashtra 2002 ) म्हणून संबोधला जातो. या जिल्ह्याला तीन राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात गडचिरोलीचे महत्व मोलाचे आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या नद्यांना पावसाळ्यात मोठा महापूर येतो. त्यामुळे दर पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्याचा राज्याशी संपर्क तुटतो. मात्र जुलै 2022 महिन्यात आलेल्या महापुराचे पाणी ( Flood In Maharashtra 2022 ) 249 गावात शिरले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या महापुरात 84 नागरिकांना आपली जीव गमवावा ( 84 People Died In Flood In Maharashtra 2022 ) लागला. इतक्या मोठ्या प्रमाणात महापूर आल्यामुळे नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी 35 शिबिरांची स्थापना ( Flood Affected People Relief Camps In Maharashtra 2022 ) करण्यात आली. या छावण्यात नागरिकांना ठेवून त्यांचा जीव वाचवण्याचे काम प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

नैसर्गिक आपत्तीत राज्यातील 5968 नागरिकांचा केला बचाव महाराष्ट्र राज्यात 2022 मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ( Natural Disaster 2022 ) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात 44 घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. तर 1368 घरांचे ( House Collapse In Flood 2022 ) किरकोळ नुकसान झाले आहे. पावसाळ्यात घरांची पडझड झाल्यामुळे या नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या नैसर्गिक आपत्तीत ( Animal Died In Natural Disaster 2022 ) 180 जनावरे दगावली आहेत. महाराष्ट्र राज्याला 2022 हे वर्ष फार वेदनादायी ठरले आहे. यावर्षात 344 नागरिकांनी आपला जीव गमावल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांवर पोरके होण्याची वेळ आहे.

Last Updated : Dec 22, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.