मुंबई : मध्य प्रदेशातील चंबळ येथे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 85 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. बुडवणाऱ्या मुंबईतील पीएसएल कंपनी विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या अगोदर देखील याच कंपनीने एक्झिम बँकेलाही 105 कोटी रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणी, गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात सीबीआयने कंपनी व तिच्या संचालकांविरोधात मुंबईत गुन्हा दाखल केला होता.
बँकेकडून इतके कर्ज घेतले: उद्योगासाठी लागणाऱ्या पाईपची निर्मिती आणि वितरण क्षेत्रात काम करणारी पीएसीएल कंपनीला चंबळ येथे एका प्रकल्पाचे काम मिळाले होते. त्यासाठी कंपनीने युनियन बँकेला 85 कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज दाखल केला होता. यापूर्वीही कंपनीने युनियन बँकेकडून 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतले होते. या कर्जासाठी बँकेने कंपनीला काही अटी आणि शर्ती घातल्या होत्या. त्यांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेने कंपनीला याचा खुलासा करण्यास सांगितला. त्याचप्रमाणे याची स्वतंत्रपणे चौकशी देखील सुरू केली. या दरम्यान कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता असल्याचे आढळून आले.
बँकेला 260 कोटी रुपयांचा गंडा: मात्र, कंपनीने जे 85 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा संबंधित प्रकल्पासाठी विनियोग केल्याचे प्रमाणपत्र कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट मेसर्स आर. देवराजन यांनी दिले होते. यानंतर बँकेने स्वतंत्रपणे कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले. त्या ऑडिटमध्ये धक्कादायक बाबी बँकेच्या निदर्शनास आल्या. कंपनीला कर्जापोटी जी रक्कम मिळाली होती. त्याचा वापर कंपनीने संबंधित प्रकल्पासाठी केलाच नव्हता. तर ते पैसे कंपनीने अन्य बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरल्याचे आढळून आले. त्याचाच परिणाम बँकेला एकूण 260 कोटी रुपयांचा गंडा घातलाचे निदर्शनास आले.
तीन जणांवर गुन्हा दाखल: बँकेच्या लेखी तक्रारीच्या आधारे मुंबईत सीबीआयने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक पुंज, अलोक पुंज यांच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या व्यवहारांसंबंधी खोटे प्रमाणपत्र जारी केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनीचे चार्टर्ड अकाउंटंट मेसर्स आर देवराजन यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -