ETV Bharat / state

धारावीत कोरोनाचे २४ नवीन रुग्ण तर एकूण संख्या १३५३वर - dharavi corona update

धारावीत २४ तासांत २६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या १ हजार ३५३ वर पोहोचली असून, ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

new covid 19 patient
धारावीत कोरोनाचे २४ नवीन रुग्ण तर रुग्णांची संख्या १३५३ वर
author img

By

Published : May 19, 2020, 7:42 PM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत सोमवारी तब्बल ८५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे महापालिका आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. असे असताना आज रुग्णसंख्येत घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. धारावीत २४ तासांत २६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या १ हजार ३५३वर पोहोचली असून, ५६ जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून धारावीतील रुग्णांची संख्या दोन ते तीन पटीने वाढली होती. धारावी ही दाटीवाटीची वस्ती असल्याने येथे कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. येथील वाढत्या संसर्गावर नियंत्रणासाठी पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. घरोघरी सर्व्हेक्षण, जास्तीत जास्त तपासण्यावर भर, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ क्वारंटाईन करण्यासाठी प्रयत्न, आरोग्य शिबिरे, कंन्टेटमेंट झोनमध्ये पोलीस बंदोबस्त ठेऊन खबरदारी आदी उपाययोजना प्रशासनाकडून राबवल्या जात आहेत. मात्र, तरिही गेल्या काही दिवसांत वाढणारी रुग्णांची आकडेवारी ही चिंतेत भर टाकणारी आहे.

सोमवारी धारावीमध्ये तब्बल ८५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. मंगळवारी दुसऱ्याच दिवशी या आकडेवारीत घट झाल्याने पालिकेच्या प्रयत्नांना यश येताना दिसते आहे. मंगळवारी सापडलेले रुग्ण मुस्लिम नगर, माटुंगा लेबर कॅम्प, इंदिरा नगर, लक्ष्मी चाळ, जनता सोसायटी, सर्वोदय सोसायटी, सोशल नगर, मुकुंद नगर, सोशल नगर, काळा किल्ला, कुंची कुरवे नगर या परिसरातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दादरमध्ये ३ तर माहिममध्ये १३ नवीन रुग्ण -

दादरमध्ये मंगळवारी ३ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. आतापर्यंत येथील रुग्णांची संख्या १७६ झाली असून, ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर माहीममध्ये कोरोनाचे मंगळवारी १३ नवे रुग्ण आढळल्याने येथे आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा २३४वर पोहोचला आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.