ETV Bharat / state

मुंबईत अद्यापही २१ पूल धोकादायक, ऑक्टोबरमध्ये सुरु होणार बांधकाम - carporation

या पुलांचे बांधकाम दोन वर्षात केले जाणार आहे. त्यासाठी पालिका २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. इतर धोकादायक पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसून पावसाळ्यात हे पूल बांधणे शक्य नसल्याने आता पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर या पुलांचे बांधकाम सुरु केले जाऊ शकते,अशी शक्यता  पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई महापालिका
author img

By

Published : Jun 2, 2019, 3:26 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. त्यात मुंबईमधील २१ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यापैकी पश्चिम उपनगरातील सहा पुलांचे बांधकाम ऑक्टोबरपासून केले जाणार आहे. इतर पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने मुंबईकरांना या धोकादायक पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.

२१ पूल धोकादायक असल्याची माहिती समोर आली आहे

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३७४ पैकी २७६ पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यात १८ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. ८ धोकादायक पूल पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने पाडले आहेत. पालिकेच्या पूल विभागाने पश्चिम व पूर्व उपनगरातील अनुक्रमे १५७ व ६६ पुलांचे ऑडिट केले आहे.

नव्या ऑडिटनुसार एकूण १५ धोकादायक पूल वाढले असून, एकूण धोकादायक पुलांची संख्या २१ वर गेली आहे. मुंबई महापालिकेकडून गोरेगाव ते कांदिवलीमधील पाडण्यात येणार्‍या विठ्ठल मंदिर इराणीवाडी, एसव्हीपी नगर रोड कृष्णकुंज, आकुर्ली रोड तसेच, गोरेगाव येथील वालभाट नाला, मालाड येथील एस. व्ही. रोड बाटा शोरूम येथील पुलांचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे.

या पुलांचे बांधकाम दोन वर्षात केले जाणार आहे. त्यासाठी पालिका २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. इतर धोकादायक पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसून पावसाळ्यात हे पूल बांधणे शक्य नसल्याने आता पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर या पुलांचे बांधकाम सुरु केले जाऊ शकते,अशी शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धोकादायक पुलांची यादी -
पश्चिम उपनगर - हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नालाब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंज जवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज

पूर्व उपनगर - कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज, विक्रोळी पंतनगर नाला

Intro:मुंबई
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पुलाच्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबईमधील धोकादायक पुलांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले. त्यात मुंबईमधील २१ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यापैकी पश्चिम उपनगरातील सहा पुलांचे बांधकाम ऑक्टोबरपासून केले जाणार आहे. इतर पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने मुंबईकरांना या धोकादायक पुलावरून आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. Body:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे पालिकेने सर्व पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३७४ पैकी २७६ पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यात १८ पूल धोकादायक असल्याचे समोर आले आहे. ८ धोकादायक पूल पालिकेने सुरक्षेच्या दृष्टीने पाडले आहेत. पालिकेच्या पूल विभागाने पश्चिम व पूर्व उपनगरातील अनुक्रमे १५७ व ६६ पुलांचे ऑडिट करण्यात आले आहे. नव्या ऑडिटनुसार एकूण १५ धोकादायक पूल वाढले असून एकूण धोकादायक पुलांची संख्या २१ वर गेली आहे. मुंबई महापालिकेकडून गोरेगाव ते कांदिवलीमधील पाडण्यात येणार्‍या कांदिवली येथील विठ्ठल मंदिर इराणीवाडी, एसव्हीपी नगर रोड कृष्णकुंज, आकुर्ली रोड, तर गोरेगाव येथील वालभाट नाला, मालाड येथील एस. व्ही. रोड बाटा शोरूम येथील पुलांचे बांधकाम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. या पुलांचे बांधकाम दोन वर्षात केले जाणार आहे. त्यासाठी पालिका २७ कोटी रुपये खर्च करणार आहे. इतर धोकादायक पुलांबाबत अद्याप निर्णय झाला नसून पावसाळ्यात हे पूल बांधणे शक्य नसल्याने आता पावसाळ्यानंतर म्हणजेच ऑक्टोबरनंतर या पुलांचे बांधकाम सुरु केले जाऊ शकते अशी शकयता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

धोकादायक पुलांची यादी -
पश्चिम उपनगर - हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नालाब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंज जवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज

पूर्व उपनगर - कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज, विक्रोळी पंतनगर नाला Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.