मुंबई 2024 Song Dispute: नवीन वर्षाचे 2024 चे गाणे हे कॉपीराईट असल्यामुळे त्याबाबतचा वाद मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला होता. फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड अर्थात पीपी एल आणि कामाकाझी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा हा वाद होता. झालं असं की 2024 नवीन वर्ष एका आठवड्यावर येऊन ठेपलेलं आहे. यानिमित्ताने जगभरात आणि भारतात देखील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले गेलेले आहे. अशाच एका लखनऊमधील हॉटेल रमाडा या ठिकाणी पार्टीचे आयोजन आणि तेथे नवीन गाणं वाजवण्याचे नियोजन झाले होते. याबाबत कामकाझी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर याबाबत जाहिरात दिली होती. मात्र याला पी पी एल कंपनीने आक्षेप घेतला. (Kamakazi Solutions Pvt)
या कारणाने गाणे वाजवण्यास मनाई: मुंबई उच्च न्यायालयात पी पी एल कंपनीचे वकील शरण जागितीयानी यांनी बाजू मांडली. फोन ग्राफी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीकडे जगभरातील 400 अशा संगीतांचे गाण्यांचा परवाना आहे. तसेच आंतरराष्ट्रीय 45 लाखाहून अधिक ध्वनी रेकॉर्डिंग संप्रेषणचा परवाना त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कॉपीराईट कायदा 1957 च्या कलम 30 नुसार त्यांच्याकडील कोणतेही गाणं सार्वजनिक रित्या प्रसारित करायचं असेल, तर त्यांची मंजुरी आवश्यक आहे. परंतु तसे यामध्ये झालेले नाही. म्हणून लखनऊ शहरातील हॉटेल रामाडा या ठिकाणी नवीन वर्षाचे गाणे पी पी एल कंपनीच्या परवानाशिवाय वाजवू शकत नाही.
पुढील सुनावणी 5 जानेवारीला: दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती आय आर छागला यांनी सांगितले की," उपलब्ध तथ्य आणि पुराव्या आधारे ही बाजू स्पष्टपणे समोर येते की, आंतरराष्ट्रीय आणि भारतातील अनेक अशा संगीत आणि गाण्यांवर कॉपीराईटचा संप्रेषणाचा अधिकार पी पी एल यांच्याकडे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच यासंदर्भात परवाना न घेता नवीन वर्षाचे गाणे हॉटेल रमाडा लखनऊ या ठिकाणी वाजवण्यापासून कामाकाझी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.. तसेच 5 जानेवारी 2024 रोजी यासंदर्भातील पुढील सुनावणी न्यायालयाने निश्चित केलेली आहे.
हेही वाचा: