ETV Bharat / state

Stone Fell From Building : धक्कादायक! वरळीत इमारतीवरून दगड कोसळून २ जणांचा मृत्यू

मुंबईतील वरळी येथील फोर सिझन हॉटेलच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनाम्याला सुरूवात केली आहे. घटनेत मृत व्यक्तींचे मृतदेह नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

author img

By

Published : Feb 14, 2023, 10:36 PM IST

Updated : Feb 15, 2023, 1:37 PM IST

Stone Fell From Building
वरळीत इमारतीवरून दगड कोसळून २ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबई शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वरळीतील फोर सिझन हॉटेलच्या बाजूला बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दगड पडून दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे. मृत व्यक्तीचे मृतदेह नायर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. ही माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अशी माहिती मिळतेय.

४२ व्या मजल्यावरून दगड कोसळला : वरळी गांधीनगर येथे सुप्रसिद्ध फोर सीजन हॉटेल आहे. या हॉटेलच्या बाजूला फोर सीजन रेसिडेन्सी ४२ मजल्यांची इमारत उभारली जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना ४२ व्या बांधकामासाठी वापरण्यात येणारा दगड खाली कोसळला. हा दगड या इमारती खालून जाणाऱ्या दोघ जणांवर कोसळला. यामुळे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि १०८ ॲम्बुलन्स दाखल झाली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी : या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघांना ॲम्बुलन्समध्ये आणून डॉक्टरांकडून तपासण्यात आले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी या दोघांचाही मृत्यू झाल्याचे घोषित केले. मृत्यू झाल्याने दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असताना दगड कोसळून दोन त्यांचा मृत्यू झाल्याने दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

९ जानेवारीला लिफ्ट कोसळली : वरळीतील बी. जी. खेर मार्गावरील प्रेमनगर परिसरात ९ जानेवारी रोजी अविघ्न १५ मजली इमारतीचे बांधकाम सुरु होते. या इमारतीमधील काचेच्या सफाईचे काम सुरु होते. त्यावेळी लिफ्टची केबल तुटली. त्यामुळे लिफ्ट कोसळली. लिफ्ट कोसळल्याची माहिती अग्निशमन दल, पोलीस यांना देण्यात आली. पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने दोन जखमी कर्मचाऱ्यांना बाहेर काढून नायर रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला होता.

५ वर्षात ४९ हजार १७९ दुर्घटनांची नोंद : घरे, घरांच्या भिंती कोसळणे, समुद्रात बुडणे, नाल्यात बुडणे, नदीत बुडणे, विहिरीत पडणे, खाडीत पडणे, खदानात पडणे, मॅनहोलमध्ये पडणे अशा घटना सतत झाल्या. २०१३ पासून २०१८ या ५ वर्षांच्या कालावधी ४९,१७९ दुर्घटनांची नोंद पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे. त्यात ९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०६६ जण जखमी झाले आहेत. १ जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ पर्यंत एकूण १३ हजार १५० दुर्घटना घडल्या. यात १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. १३२ पुरुषांचा आणि ४७ स्त्रियांचा समावेश आहे. ७२२ जण जखमी झाले.

हेही वाचा : Wedding On Valentine Day : 'व्हॅलेंटाईन डे'दिवशी शेकडो कपल्स अडकले विवाहबंधनात; उडवला प्रेमाचा बार

Last Updated : Feb 15, 2023, 1:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.