मुंबई- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्याच्या महसुलात मोठी घट झाली आहे. मात्र, अशात सरकारला आता दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मुद्रांक शुल्क नोंदणी व्यवहारात वाढ होऊ लागली आहे. परिणामी जून महिन्यात सरकारला तब्बल 179 कोटींचा महसूल एकट्या मुंबईतून मिळाला आहे. मागील तीन महिन्यातील हा सर्वाधिक महसूल आहे.
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क हा राज्याचा सर्वात मोठा महसूलाचा स्त्रोत आहे. अशात सर्वच व्यवहार ठप्प असल्याने महसूलही बंद झाला होता. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी सरकारने सुरू ठेवली होती. पण त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणूनच जूनमध्ये सरकारने मुंबईतील 10 नोंदणी कार्यालये सुरू केली आणि त्यानंतर महसूल वाढल्याचे चित्र आहे.
एप्रिलमध्ये केवळ 43 हजार 547 इतका आजवरचा सर्वात कमी महसूल मुंबईतून मिळाला होता. केवळ 27 दस्तांची नोंदणी यावेळी झाली होती. तर मे मध्ये महसूल वाढून 18 कोटी 12 लाख इतका मिळाला होता. तर 1 हजार 404 दस्तांची नोंदणी झाली होती. जूनमध्ये अनलॉक सुरू झाले आणि दस्तनोंदणीही वाढली. त्यामुळेच जून महिन्यात 179 कोटी इतका महसूल जमा झाला आहे. 13 हजार 652 दस्तांची नोंदणी झाली आहे. कोरोनाच्या संकटात महसूल वाढत असल्याने सरकारला दिलासा मिळत आहे.
दिलासा! मुद्रांक शुल्क नोंदणीद्वारे सरकारच्या तिजोरीत 179 कोटींची भर
नोंदणी आणि मुद्रांक शुल्क हा राज्याचा सर्वात मोठा महसूलाचा स्त्रोत आहे. अशात सर्वच व्यवहार ठप्प असल्याने महसूलही बंद झाला होता. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी सरकारने सुरू ठेवली होती. पण त्याला काही प्रतिसाद मिळत नव्हता.